5 January 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा
x

SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एसजेवीएन शेअर प्रतिदिन वेगात परतावा देतोय, आता शेअर स्वस्तात खरेदीची मोठी संधी

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड या जलविद्युत उत्पादन आणि ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक तेवढ्याच टक्के घसरणीसह ट्रेड करत आहे. बुधवार एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.31 टक्के वाढीसह 83.69 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज मात्र या स्टॉक मध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

ऑफर फॉर सेल तपशील

आज या कंपनीच्या शेअर मध्ये विक्रीचा दबाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, केंद्र सरकारने 21 सप्टेंबर 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे 4.9 टक्के भाग भांडवल ऑफर फॉर सेल अंतर्गत विकण्याची घोषणा केली होती. या ऑफर फॉर सेल अंतर्गत केंद्र सरकार एसजेवीएन लिमिटेड कंपनीमधील 9.66 कोटी शेअर्स म्हणजेच 2.46 टक्के इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

या ऑफर फॉर सेलसाठी सरकारने किमान किंमत 69 रुपये जाहीर केली होती. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.05 टक्के घसरणीसह 74.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक वाढीचे कारण

बुधवारी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स जवळपास 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ही वाढ अशा वेळी पाहायला मिळाली होती, जेव्हा या कंपनीने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनसोबत आर्थिक सहाय्यासाठी सामंजस्य करार केल्याची माहिती जाहीर केली होती. SJVN कंपनीने दिलेल्या माहिती म्हणण्यानुसार, कंपनीने PFC सोबत अक्षय ऊर्जा, प्रकल्प आणि थर्मल निर्मितीसह विविध प्रकल्पांसाठी आर्थिक सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पांचे एकूण मूल्य 1,18,826 कोटी रुपये आहे.

गुंतवणुकीवर परतावा

मागील तीन महिन्यांत एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 106 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 136 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षात एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 246 टक्के वाढली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने देखील अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत.

या वर्षी जून 2023 तिमाहीत एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 55 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. आणि कंपनीने 271.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 609.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात 30.6 टक्क्यांची घट झाली असून कंपनीने 744.39 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x