20 April 2025 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

SJVN Share Price | एसजेवीएन शेअरमध्ये जोरदार खरेदी, आज अप्पर सर्किटवर आदळला, मजबूत परतावा देतोय शेअर, डिटेल्स वाचा

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एसजेवीएन लिमिटेड कंपनीची उपकंपनी एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडला 1200 MW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डर देण्यात आली आहे.

SGEL कंपनी RFS तरतुदींनुसार भारतात ठराविक ठिकाणी 1000 MW क्षमतेचे पंजाब राज्यात 200 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हे सौर ऊर्जा प्रकल्प बांधा, ताबा घ्या, आणि चालवा म्हणजेच BOO तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसजेवीएन लिमिटेड कंपनीला देण्यात आलेल्या 1200 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बांधकाम आणि विकासाचा खर्च 7,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. 21 जुलै 2023 रोजी, एसजेवीएन लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एसजेवीएन लिमिटेड कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्या आणि संयुक्त उपक्रमांद्वारे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी REC लिमिटेड कंपनीसोबत 50,000 कोटी रुपये मूल्याचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. याशिवाय एसजेवीएन लिमिटेड कंपनीने 300 मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार संपन्न केला आहे.

24 जुलै 2023 रोजी मुंबईमध्ये 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड आणि दिल्लीमध्ये 100 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत PPA करार संपन्न करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 200 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सोलर प्रकल्पाचा विकास खर्च 1,200 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.

महावितरण कंपनीने आयोजित केलेल्या ई-रिव्हर्स लिलावात SGEL कंपनीने स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे प्रति युनिट 2.90 रुपये दर ऑफर जाहीर करून हा ऊर्जा प्रकल्प जिंकला आहे. एसजेवीएन लिमिटेड ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा निर्मिती संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणी संबंधित सल्ला देण्याचे काम देखील करते. या कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price today on 25 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या