20 April 2025 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

SJVN Share Price | SJVN कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, मोठा फायदा होणार

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 13.49 टक्के वाढून 159.60 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60,361 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने मिझोराम सरकारकडून 2400 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पाची उभारणी करण्याचे 13,947 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

शुक्रवारी एसजेव्हीएन स्टॉक 13 टक्के वाढला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60,361 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.65 टक्के वाढीसह 149.07 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

SJVN शेअर्सचा बीटा 1.8 आहे, जो एका वर्षात उच्च अस्थिरता दर्शवतो. 9 ऑगस्ट 2023 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 52.69 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 170.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. एसजेव्हीएन स्टॉकचा RSI 49.6 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

एसजेव्हीएन स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 440 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 164 टक्के वाढली आहे.

एसजेव्हीएन कंपनीला मिझोराम सरकारकडून दरझो लुई पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम करण्यासाठी एलओआय देण्यात आले आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनीला 2,400 मेगावॅट क्षमतेसह तुईपुई नदीची उपनदी असलेल्या दरझो नाल्याच्या पलीकडे पंप स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित करायचा आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 13,947.50 कोटी रुपये आहे. या प्रकल्पामध्ये 770 मीटर वरच्या आणि खालच्या जलाशयांच्या उपलब्ध हेडचा वापर करणे अपेक्षित आहे.

एसजेव्हीएन लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती करणारी सरकारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः जल विद्युत, पवन ऊर्जा, आणि सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, पॉवर ट्रान्समिशन, सल्लागार आणि पॉवर ट्रेडिंग यांचा समावेश होतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 29 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या