21 April 2025 7:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

SJVN Share Price | शेअरची किंमत 91 रुपये, अल्पावधीत 261%परतावा देणाऱ्या कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेवीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला 550 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी एसजेवीएन कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 91.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एसजेवीएन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 35,886.89 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी एसजेवीएन कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 91.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच एसजेवीएन कंपनीला गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 550 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. एसजेवीएन कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार ई-लिलावाद्वारे एसजेवीएन कंपनीने 100 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प खरेदी केला आहे.

हा प्रकल्प 550 कोटी रुपयेच्या खर्चाने 2.63 रुपये प्रति युनिटच्या बोलीवर पूर्ण केला जाईल. एसजेवीएन कंपनी आपल्या ग्रीन एनर्जी लिमिटेड या पूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे हा प्रकल्प बिल्ड-ओन-ऑपरेट तत्त्वावर विकसित करणार आहे.

एसजेवीएन कंपनीने 25 वर्षांचा वीज खरेदी करार करून 18 महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. या उपक्रमामुळे एसजेवीएन कंपनी कार्बन उत्सर्जनात 2,87,434 टन घट साध्य करणार आहे. मागील 6 महिन्यांत एसजेवीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 123 टक्के नफा कमावून दिला आहे.

2023 या वर्षात एसजेवीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत एसजेवीएन कंपनीच्या शेअर्सची किंमत 261 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SJVN Share Price today on 30 December 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या