20 April 2025 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा

Smart Investment

Smart Investment | सध्याच्या काळातली वाढती महागाई लक्षात घेता बऱ्याच व्यक्तींना भविष्याची चिंता सतावत आहे. सध्याच्या काळातच पैसे पुरत नसल्याने येणारा काळ कसा असेल याचा विचार करून आतापासूनच अनेकांनी म्युच्युअल फंड तसेच एसआयपी, त्याचबरोबर पोस्टाच्या योजना आणि इतर आणखीन चांगल्या व्याजदराच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरू केले आहे. जर तुम्हाला पैसे गुंतवून कमी काळात करोडोची रक्कम जमा करायची असेल तर, तुम्ही 15x15x15 हा फॉर्मुला नक्कीच वापरू शकता.

15x15X15 फॉर्मुला नेमका कसा काम करतो :
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, या फॉर्मुल्याचा अर्थ नेम. किंवा हा फॉर्मुला कसा काम करतो तर, 15X15x15 म्हणजे 15 वर्षांचा कार्यकाळ, 15 हजारांची एसआयपी आणि 15% वार्षिक रिटर्न. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन करून करोडपती व्हावं लागेल.

गुंतवणुकीसाठी स्वतःला द्या 15 वर्ष :
समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत आहात तर, बाजार मूल्याच्या दृष्टीने तुम्ही निवडलेला 15 वर्षांचा कार्यकाळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. कारण की या काळामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्णपणे लाभ घेता येतो. त्याचबरोबर म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे परताव्याची रक्कम देखील बदलू शकते.

गरजेनुसार असावी गुंतवणूक :
तुम्ही तुमचा पैसा तुमच्या गरजेनुसारच गुंतवला पाहिजे. यासाठी तुम्हाला वेळ आणि लक्ष्य या दोघांचा ताळमळ व्यवस्थित बसवता आला पाहिजे. समजा तुम्ही दीर्घकाळासाठी जास्तीत जास्त गुंतवण करत असाल तर, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अधिक स्टॉक ठेवू शकता. अन्यथा तुम्ही बाँडवर लक्ष केंद्रित करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला निवृत्तीसाठी पैसे जमा करायचे असतील तर, तुम्ही जास्तीत जास्त पैशांची गुंतवणूक करू शकता. कारण की तुम्ही दीर्घकाळासाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मिळणारा परतावा हा देखील तितकाच दुप्पट असू शकतो.

प्रतिवर्ष 1.8 लाखांची गुंतवणूक :
समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 15,000 हजार रुपयांची गुंतवणूक करत आहात तर, एका वर्षाला तुमच्या खात्यात 1.8 लाख रुपये जमा होतात. म्हणजेच पुढील 15 वर्षांमध्ये तुमच्या खात्यात एकूण 27 लाख रुपयांची रक्कम जमा होते. अशातच पंधरा वर्षांनंतर तुम्ही गुंतवलेले 27 लाख हे 1 करोडपेक्षा जास्त होतील. असं असल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्णपणे लाभ मिळतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 03 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या