16 October 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ, 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार - Marathi News NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC
x

Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील

Smart investment

Smart investment | भारतातील बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की, आपल्याला भविष्यात भडगंज रक्कम जमा करायची असेल तर अधिक पटीने पैसे गुंतवावे लागतात. परंतु असं अजिबात नाही बऱ्याच अशा योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार कमी पैशांमध्ये देखील गुंतवणूक करून भविष्यात चांगला निधी जमा करू शकता.

आज आम्ही तुम्हाला एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचा पर्याय सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही एसआयपी द्वारे पैसे गुंतवून रिटायरमेंटपर्यंत करोडोंची रक्कम जमा करू शकता. यासाठी तुम्हाला 555 हा फॉर्मुला वापरावा लागेल. हा फॉर्मुला वापरू नये एसआयपी द्वारे तुम्ही 2,000 हजार रुपयांपासून देखील गुंतवणूक सुरू करू शकता. दोन हजारांची गुंतवणूक तुम्हाला 55 वर्षांपर्यंत शंभर टक्के करोडपती बनवेल.

असं काम करतो 555 हा फॉर्मुला :
तुम्हाला सुद्धा करोडपती बनायचं असेल तर वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून तुम्हाला गुंतवणूक सुरू करावी लागेल. ही गुंतवणूक तुम्हाला वयाच्या 30 वर्षापर्यंत करायची आहे. दरम्यान प्रत्येक वर्षाला गुंतवणुकीतील 5% रक्कम वाढवून पुढे गुंतवणूक करत राहायचं आहे. म्हणजे तुम्ही 25 वर्षापासून गुंतवणूक सुरू केली तर, प्रत्येक वर्षाने 5% च्या हिशोबाने रक्कम वाढवून पैसे गुंतवायचे आहेत. समजा एखादा व्यक्ती लगातार 30 वर्षापर्यंत पैसे गुंतवत असेल तर त्याचं वय 55 वर्ष होऊन जाईल. म्हणजेच तुम्ही प्रत्येक वर्षाला 5% ने रक्कम वाढवून 55 वर्ष होईपर्यंत म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत करोडपती बनू शकता.

एसआयपी करून काम होईल सोपं :
बऱ्याच व्यक्तींना गुंतवणुकीचे पर्याय मिळत नाहीत. किंवा त्यांना त्यांच्या बजेटनुसार देखील गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होत नाहीत. परंतु एसआयपी SIP हा एक गुंतवणुकीचा असा पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी अमाऊंट देखील गुंतवू शकता. तुम्हाला 2,000 रुपयांची एसआयपी करावी लागेल. ज्यामध्ये तुम्हाला 555 हा फॉर्मुला वापरावा लागेल. म्हणजे तुम्हाला 55 वर्षापर्यंत करोडपती व्हायचं असेल तर, प्रत्येक वर्षाला 5% ने गुंतवणूक वाढवावी लागेल.

हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घ्या :
समजा एखाद्या व्यक्तीने 2 हजारांची एसआयपी सुरू केली आहे. तर, एसआयपी सुरू होण्याच्या एका वर्षानंतर 5% ने जास्त रक्कम जमा करावी लागेल. 5 टक्के म्हणजेच 100 रुपये. जेणेकरून तुम्ही दुसऱ्या वर्षाला 2,100 रुपयांची वर्षभर गुंतवणूक कराल. त्याच्या पुढच्या वर्षी 2,205 अशा पद्धतीने प्रत्येक वर्षाला 5% रक्कम वाढवून तुम्ही रीतसर गुंतवणूक करून चांगले पैसे जमा करू शकता. समजा तुम्ही 25 वर्षाचे असताना 2000 ने एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करत असाल तर, 30 वर्षांमध्ये तुम्ही एकूण 15,94,532 रुपयांची रक्कम जमा करू शकता. यामध्ये 12% व्याजदराच्या परताव्यामध्ये तुम्हाला 89,52,280 एवढी रक्कम मिळेल. अशा पद्धतीने 555 हा फॉर्मुला वापरून तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत 1,05,46,812 रुपयांचे मानकरी होऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart investment 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x