Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News
Smart Investment | सध्या शेअर मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी पुरेपूर माहिती नसते. त्याचबरोबर शेअर मार्केट कधी पडेल याची देखील काही शाश्वती नसते. त्यामुळे बरेच लोक शेअर मार्केटमधील पैसे गुंतवणुकीची जोखीम उचलत नाहीत.
अनेकांना वाटतं की, करोडो रुपये कमवण्यासाठी केवळ जोखीम पत्कारून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे लागतील. परंतु सध्या गुंतवणूकदारांसमोर इतरही अशा योजना आणि गुंतवणुकीची साधनं आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करावी लागत नाही. नेमक्या कोणत्या आहेत या योजना पाहून घेऊ.
एफडी फिक्स्ड डिपॉझिट :
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित आणि निश्चित वेळेपर्यंत गुंतवू शकता. तुम्ही तुमच्या आवडत्या बँकेमध्ये एफडी करू शकता. बँक तुम्हाला एफडीवर योग्य व्याजदर देखील देते. बँकेच्या एफडीचा शेअर बाजारातील गुंतवणुकीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे जेव्हा मार्केट पडतं तेव्हा एफडीमध्ये सुरक्षित असलेल्या तुमच्या पैशांना काहीही होत नाही. सध्या एफडीवर तुम्हाला 8% व्याज मिळत आहे.
म्युच्युअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन :
एसआयपी तसेच म्युच्युअल फंड या योजना मार्केट बेस्ड असून सुद्धा तुम्ही अगदी सहजरीत्या गुंतवणुकीचा विचार करू शकता. तुम्ही मार्केट पडताना कमी युनिटचे शेअर खरेदी करून आणि SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करून प्रत्येक वर्षाला योग्य व्याजदरासह बक्कळ पैसे कमवू शकता.
सोन्यामध्ये गुंतवणूक :
सोन्यामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक अस्थिरतेपासून वाचणे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला 100% फायदा मिळवून देते. बरेच गुंतवणूकदार संकटकाळी शेअर बाजारात गुंतवणूक केली असून सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास धाव घेतात. तुम्ही तुमचं सोन इटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये SGBs मध्ये गुंतवणूक करू शकता.
रियल इस्टेटमधील गुंतवणूक :
सध्या बऱ्याच ठिकाणी रियल इस्टेटमधील बऱ्याच प्रॉपर्टीयांना स्थिरता प्रदान झाली आहे. अशावेळी तुम्ही रियल इस्टेटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता. रियल इस्टेटमधील सरासरी परतावा 6 ते 8% टक्क्यांपर्यंत असतो.
सरकारच्या छोट्या बचत योजना :
सध्या सरकारच्या पोस्टाच्या तसेच इतरही छोट्या बचत योजनांमध्ये तुफान गुंतवणूक सुरू आहे. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी सीनियर सिटीजन सेविंग स्कीम तसेच इतरही पेन्शन योजना उपलब्ध आहेत. यामधील काही योजना टॅक्स फ्री आहेत तर, काहींना कर सवलतीची सूट दिली गेली नाहीये. परंतु या योजनांवर तुम्हाला 8% तसेच 7.1% पर्यंत परतावा मिळतो. योजनांचा प्लस पॉईंट म्हणजे या योजना सरकारी असल्यामुळे त्या 100% सुरक्षित आणि परताव्याची हमी देतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Smart Investment 22 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती