Smart Investment | नवीन वर्षात तुमची आर्थिकस्थिती मजबूत करण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी, बँक बॅलेन्स देईल उत्तर
Smart Investment | 2024 हे वर्ष काही दिवसांतच सुरू होणार आहे. अशा वेळी लोक वेगवेगळे संकल्प घेतात. संकल्प करून त्याचे पालन केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. वर्ष 2024 मध्ये जर तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही केलं तर त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल. कारण एकदा चांगले आर्थिक नियोजन केले की त्यातून पैशांची ही बचत होते आणि आगामी काळात तुम्ही तुमचे पैसे आणखी वाढवू शकता.
तसेच अचानक एखादा मोठा खर्च झाला तर तो तुम्ही अगदी सहज पणे हाताळू शकता. अशाच काही मार्गांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्ही या नवीन वर्षापासून आपल्या आर्थिक सवयी सुधारण्यासाठी करू शकता.
अति-खर्च टाळा
लोकांना अनेकदा जेवढे पैसे मिळतात तेवढे उडवण्याची सवय असते. अशावेळी अचानक गरज पडल्यास इतरांसमोर हात पसरावा लागतो. म्हणूनच अनावश्यक खर्च कमी करून पैसे वाचवण्याची सवय आधी लावावी. एकदा तुम्हाला पैसे वाचवण्याची सवय लागली की हळूहळू ते पैसे वाचवून मग ते गुंतवून तुम्ही तुमची रक्कम वाचवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या कमाईच्या 50 टक्के रक्कम कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या कामावर खर्च करता. उरलेली ३० टक्के रक्कम आपले छंद पूर्ण करण्यासाठी वापरता येईल. त्याचबरोबर आपल्या पगारातील २० टक्के बचत करणे अत्यंत गरजेचे आहे.
इन्शुरन्स महत्त्वाचा अन्यथा अडचणीत याल
विमा आपल्या जीवनाचे रक्षण करतो आणि अचानक आर्थिक समस्यांमध्ये आपल्याला मदत करतो. आपल्याकडे वैद्यकीय आणि अपघाती विमा असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जर तुम्हाला कधी अपघात झाला किंवा तुम्ही आजारी पडलात तर कुटुंबावर कोणतेही आर्थिक संकट येत नाही. अशा सर्व समस्या टाळण्यासाठी आपण स्वतःचा आणि कुटुंबातील सदस्यांचा विमा उतरवला पाहिजे.
बॅकअप फंड नेहमी सोबत ठेवा
बॅकअप फंडाचा वापर आपत्कालीन निधी म्हणूनही केला जाऊ शकतो. अचानक एखादी विशेष किंवा तातडीची परिस्थिती उद्भवल्यास या पैशांचा वापर करावा. जर तुम्ही इमर्जन्सी फंडासाठी बचत केली असेल तर अचानक आलेल्या समस्येचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाही. नवीन वर्ष २०२४ पासून इमर्जन्सी फंडासाठी थोडे पैसे ठेवले तर हळूहळू ती तुमची सवय बनेल आणि नंतर तुमच्याकडे ही चांगली रक्कम असेल.
गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे
जर तुम्हाला तुमचे पैसे वाढवायचे असतील तर सर्वात महत्वाची गुंतवणूक त्यासाठी असते. जर तुम्ही 11 ते 12 वर्षे दरमहा फक्त 5 ते 6 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही सहज लाखो रुपये कमवू शकता. इच्छित असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता. याशिवाय डिजिटल सोने हे गुंतवणुकीचे एक सुरक्षित माध्यम आहे, जे आपल्याला बाजारातील चढउतारांपासून संरक्षण देते.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरकारच्या विविध योजनेतही पैसे टाकू शकता, ज्यात तुमच्या गुंतवणुकीची रक्कम काही वर्षांच्या आत दुप्पट होते. जर तुम्ही हळूहळू गुंतवणूक करत राहिलात तर 8 ते 10 वर्षांनंतर तुमच्याकडे मोठा फंड बँकेत असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Smart Investment tips for New Year 2024 check details 21 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल