16 April 2025 10:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Smart Investment | कमी मुदतीत लाखोंचा परतावा मिळवून देणाऱ्या योजना आहेत तरी कोणत्या, 1 वर्षाच्या बचतीतून बनाल लखपती

Smart Investment

Smart Investment | बाजारामध्ये गुंतवणुकीचे नाना प्रकारचे पर्याय पाहायला मिळतात. बऱ्याचदा गुंतवणुकीत अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक असे दोन गट पाहायला मिळतात. दीर्घकाळात आपण कमीत कमी पैसे गुंतवून देखील मोठा फंड तयार करू शकतो. त्याचबरोबर अल्पकाळ योजनांमध्ये देखील जास्त व्याजदर मिळत असेल तर, लवकरात लवकर मोठा फंड तयार होण्यास मदत होते.

व्यक्तीला त्याच्या जीवनात कधीही वेळ अभावी पैशांची गरज भासू शकते. अशावेळी अल्पमुदत योजना अत्यंत कामी येतात. आज आपण अल्पमुदत असलेल्या काही सुपरहिट योजनांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवृत्ती ठेव योजना :

बऱ्याच व्यक्तींना आपल्या पगारातील ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला बाजूला काढायची असते. केवळ घरामध्ये पैसे साठवून ठेवण्यापेक्षा तुम्ही आवृत्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता.

आरडी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही संपूर्ण बँकांमधील रिकरिंग डिपॉझिटिचे व्याजदर तपासून घ्या. तुम्हाला ज्या बँकेत व्याजदर जास्त वाटत असेल तिथे तुम्ही प्रत्येक महिन्याला पैसे गुंतवण्याचा विचार करा. ही योजना तुम्हाला मॅच्युरिटीनंतर व्याजासकट पैसे परत देते.

बँकेत मुदत ठेव म्हणजेच बँक एफडी :

बँक एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट. तुम्हाला कमीत कमी रक्कम गुंतवून पैसे जोडायचे असतील तर बँकेची एफडी तुमचं काम सोपं करू शकते. बहुतांश व्यक्तींना गुंतवणुकीचा पर्याय म्हणून एफडी सुरक्षित वाटते. तुम्ही बँकेमध्ये दहा दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत बँक एफडी करू शकता. यावर तुम्हाला निश्चित व्याजदर प्राप्त होते.

कार्पोरेट एफडी :

अनेकांना असा प्रश्न पडतो की कार्पोरेट एफडी म्हणजे नेमकं काय. तर, कार्पोरेट एफडी एखाद्या बँक एफडीप्रमाणेच काम करते. यामध्ये कंपनीकडून एक प्रकारचा फॉर्म दिला जातो. हा फॉर्म गुंतवणूकदार ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे कार्पोरेट एफडीमधील व्याजदरे हे सामान्य बँकेतील एफडीपेक्षा जास्त असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर यामध्ये मजबूत आणि उच्च दर्जाचा परतावा असला तरी सुद्धा बँकेतील एफडीपेक्षा कार्पोरेट एफडीमध्ये जोखीम उचलावी लागू शकते.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन :

तुम्ही मार्केटमध्ये कमी काळ गुंतवणुकीची योजना शोधत असाल तर, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही योजना देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण की या योजनेमध्ये तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ आणि हवे तितके पैसे गुंतवू शकता. एसआयपी गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 12 टक्क्यांनी दिला जातो. त्यामुळे कमी पैसे गुंतवण देखील तुम्ही जास्तीत जास्त व्याजाने पैसे कमवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment Wednesday 01 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(101)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या