19 April 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Somany Ceramics Share Price | 45% स्वस्त झालेल्या या शेअरची म्युच्युअल फंड हाउसेसकडून जोरदार खरेदी, मोठ्या परताव्याचे संकेत?

Somany Ceramics Share Price

Somany Ceramics Share Price | सोमानी सिरॅमिक्स कंपनीमध्ये पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने मोठी गुंतवणूक केली आहे. मागील वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 45 टक्के पेक्षा अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार PGIM India Mutual Fund ने सोमानी सिरॅमिक्स कंपनीचे 3.07 लाख शेअर्स 499.03 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले आहेत. याचा अर्थ PGIM इंडिया म्युच्युअल फंडाने या कंपनीमध्ये 15,32,02,210 म्हणजेच 15.32 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या म्युच्युअल फंड हाऊसने 4 जानेवारी 2022 रोजी ही गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Somany Ceramics Share Price | Somany Ceramics Stock Price | BSE 531548 | NSE SOMANYCERA)

म्युचुअल फंड हाऊसचा 4.36 टक्के वाटा :
जे लोक बॉटम फिनिशिंगवर विश्वास ठेवतात, ते सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या स्टॉकच्या शोधत असतात. सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीमध्ये L&T म्युच्युअल फंड, फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंड, कोटक स्मॉल कॅप फंड यासारख्या दिग्गज म्युचुअल फंड हाऊसची होल्डिंग आहे. जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीत शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार L&T हायब्रिड इक्विटी म्युचुअल फंडकडे सोमनी सिरॅमिक्स कंपनीचे 16,00,267 शार्सा होल्ड आहेत. या कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 3.77 टक्के भाग भांडवल L&T हायब्रिड इक्विटी म्युचुअल फंडकडे आहे. त्याचप्रमाणे , फ्रँकलिन बिल्ड इंडिया म्युचुअल फंडाकडे सोमनी सिरॅमिक्सचे 18.50 लाख शेअर्स आहेत, ज्याचे प्रमाण एकूण पेड-अप भांडवलाच्या 4.36 टक्के आहे. कोटक स्मॉल कॅप म्युचुअल फंडाकडे ही सोमनी सिरॅमिक्सचे 28,43,640 शेअर्स होल्ड आहेत, ज्याचे प्रमाण कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 6.69 टक्के आहे. सप्टेंबर 2022 तिमाही डेटानुसार सर्व म्युच्युअल फंड हाऊस कडे सोमनी सिरॅमिक्स कंपनीचे 17.03 टक्के भाग भांडवल होल्ड आहे.

सोमानी सिरॅमिक्स शेअरचा इतिहास :
सोमनी सिरॅमिक्स कंपनीच्या शेअरवर मागील एक वर्षापासून विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी उलाढाल बेअर्ससाठी गुंतवणूक करण्याची मोठी संधी ठरली आहे. त्यामुळे वर्षभर हा स्टॉक गुंतवणूकदारांच्या आवडत्या ‘ सेल ऑन राइज ‘ स्टॉक गटात राहिला आहे. सोमानी सिरॅमिक्स कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका महिन्यात 525 रुपयेवरून 500 रुपयेवर आली आहे. मागील एक महिन्यात या स्टॉकमध्ये 5 टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 575 रुपये वरून सुमारे 500 प्रति शेअरवर आली आहे. म्हणजेच या कालावधीत शेअरची किंमत 15 टक्के कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मागील एका वर्षात सोमनी सिरॅमिक्स कंपनीच्या शेअरची किंमत 900 रुपये वरून खाली आली आहे. म्हणजेच या काळात शेअर 45 टक्क्यांनी पडला आहे. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी सोमाणी सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के घसरणीसह 498.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड हाऊसने सोमानी सिरॅमिक्स कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याची बातमी येताच शेअरमध्ये 3 टक्के वाढ पाहायला मिळली होती, मारे स्टॉक आज पुन्हा एकदा खाली पडला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Somany Ceramics Share Price 531548 SOMANYCERA in focus check details on 06 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या