22 November 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या

Sprayking Agro Equipment Share Price

Sprayking Agro Equipment Share Price| ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 16 मार्च 2023 रोजी या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 3 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 3 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Sprayking Agro Equipment Limited)

स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीने जाहीर निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनी लवकरच बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट जाहीर करेल. “कंपनीच्या संचालक मंडळाने 16 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 3 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला शेअर धारकांची मंजुरी येणे बाकी आहे”. अशी माहिती स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीने दिली आहे.

एका वर्षात 262.98 टक्के परतावा :
सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीचे शेअर्स 102.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 61.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 262.98 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 144.45 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बोनस शेअर म्हणजे काय? :
काही कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रोत्साहन म्हणून मोफत शेअर्स वाटप करते, त्याला बोनस शेअर्स म्हणतात. या बोनस शेअरचे प्रमाण कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे ठरवले जाते. बोनस शेअर्स अंतर्गत 3 महत्त्वाच्या तारखा खैर केल्या जातात. त्यात रेकॉर्ड तारीख, एक्स तारीख, आणि इश्यू तारीख असतात. रेकॉर्ड तारीखेच्या आधारे बोनस शेअर्ससाठी कोण कोण पात्र आहेत, हे ठरविले जाते. रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स दिले जातात. एक्स बोनस तारीख सामान्यतः रेकॉर्ड तारखेच्या एक दिवस आधी असते. बोनस शेअर्ससाठी पात्र होण्यासाठी, गुंतवणूकदाराने कंपनीचे शेअर्स एक्स डेटच्या किमान एक किंवा दोन दिवस आधी खरेदी करणे गरजेचे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sprayking Agro Equipment Share Price 540079 on 20 March 2023.

हॅशटॅग्स

Sprayking Agro Equipment Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x