15 January 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

Heavy Rain Damage | अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा | कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Agriculture Minister Dadaji Bhuse

नाशिक, ३० सप्टेंबर | जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Heavy Rain Damage) झाले असून व नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.

The heavy rains in the district have caused heavy rain damage to the crops of many farmers and disrupted the lives of the people. The disaster victims and the farmers should not be exhausted, said Dadaji Bhuse, Minister of State for Agriculture :

शासकीय विश्रामगृह येथे विविध विषयांवर आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना कृषिमंत्री भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शासकीय जमिनीवरील निवासाच्या उद्देशाने केलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याबाबतची सूचना कृषिमंत्री भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आरोग्य विभागाचा, रुरबन योजना, जलजीवन मिशन योजनेचा आढावा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: State Agriculture Minister Dadaji Bhuse orders Officials to inquire rain damage.

हॅशटॅग्स

#DadaBhuse(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x