5 November 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Stock Investment | या स्टॉकमध्ये फक्त 5 दिवसांत 16 टक्के परतावा, शेअर वेगाने पैसा वाढवतोय, स्टॉक नेम सेव्ह करा

Stock Investment

Stock Investment | भारतीय रेल्वेच्या मालकीची कंपनी राइट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ‘बुलेट ट्रेन’च्या स्पीडने तेजीत आले आहे. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वर गेले होते. या जबरदस्त तेजीनंतर राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी BSE निर्देशांकावर आपले सर्व जुने रेकॉर्ड तोडले आहेत. या शेअरनी आपली 358 रुपयांची सर्वकालीन उच्चांकी किंमत गाठली आहे.

शेअरमध्ये जबरदस्त तेजी :
मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये राइट्स लिमिटेडच्या शेअर्सने कमालीची उसळी घेतली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या PSU कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्क्यांनी वर गेली आहे. राइट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्स नी चालू वर्ष 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केल्याचे चार्ट पॅटर्न वरून दिसून येते. चालू वर्ष 2022 हा सर्व शेअर्स नी कंपनीसाठी कठीण जात असला तरी राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत भारतीय रेल्वेच्या मालकीच्या ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 226.20 रुपये होती.

जबरदस्त तिमाही निकाल :
जून 2022 च्या तिमाहीत राइट्स लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नद्यात 86 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने एकूण 145 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत राइट्स लिमिटेड ने 605 कोटी रुपये एकूण महसूल कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत राइट्स कंपनीने फक्त 355 कोटी रुपये महसूल कमावला होता. मार्च 2022 पर्यंत राइट्स कंपनीला 4939 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले होते. जबरदस्त तिमाही निकालामुळे गुंतवणुकदार अंक भागधारक यांचा शेअर वरील विश्वास अधिक वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock Investment in Rights Limited owned by Indian railways and profit has increased in short time 05 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x