18 April 2025 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Stock Investment | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 2 दिवसात 33 टक्के परतावा दिला, 1 दिवसात 19 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे हा स्टॉक?

Stock Investment

Stock Investment | टाटा समूहातील शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना हमखास नफा कमावून देतात. त्यासाठी टाटा समूहातील चांगल्या स्टॉक मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करून लक्ष किंमत स्पर्श करताच नफा कमावले पाहिजे. असाच एक टाटा समूहातील स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 13 टक्के वाढीसह दिवसा अखेर बंद झाले होते. यानंतर बुधवारी टाटा समूहाचा हा शेअर 18.57 टक्के च्या भरमसाठ वाढीसह शेअर बाजार ट्रेड करत होता.

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड :
आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत, ती टाटा समूहातील गुंतवणूक उद्योगाशी संबंधित टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी ट्रेडिंग सेशन मध्ये 13 टक्के जबरदस्त वाढीसह वाढीसह बंद झाले होते. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने एका दिवसात 18.57 टक्के उसळी घेतली होती, आणि इंट्रा डे मध्ये ट्रेडर्स नी ह्या स्टॉक मधून भरमसाठ नफा कमावला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर 2,590 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ह्या शेअर्सची ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून टाटा इन्व्हेस्टमेंट चा स्टॉक हिरव्या निशाण वर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यातील पाच ट्रेडिंग सेशन च्या दरम्यान स्टॉकमध्ये 43.50 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. फक्त दोन दिवसांपूर्वी हा शेअर 1949.90 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होता, आणि त्यात सुमारे 33 टक्केची वाढ होऊन शेअर आताच्या उच्चांक पातळी किमती पर्यंत पोहोचला आहे.

टाटा सन्सने स्थापित केलेली आणि टाटा सन्सच्या मालकीची टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कायदेशीर नोंदणीकृत असलेली एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाच्या सर्व कंपनीची पालक संस्था आहे. टाटा इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉकने एका वर्षात आपल्या भागधारकांना सुमारे 102.95 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या चाकू वर्षी 2022 मध्ये स्टॉकमध्ये 83.29 टक्केची वाढ नोंदविण्यात आली आहे.

जून तिमाहीतील कंपनीची कमाई :
जून 2022 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या एकूण निव्वळ नफ्यात तब्बल 66.5 टक्केची वाढ झाली, असून कंपनीने एकूण 89.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून महिन्याच्या तिमाहीत कंपनीने कर कपातीनंतर 59.8 कोटी नफा कमावला होता. कंपनीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने इक्विटी शेअर्स, डेट इन्स्ट्रुमेंट्स, सूचीबद्ध आणि असूचीबद्ध आणि विविध उद्योगांमधील लहान मोठ्या कंपन्यांच्या इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकीचा समावेश होतो. कंपनीच्या उत्पन्नात प्रामुख्याने दीर्घकालीन गुंतवणुकीवरील लाभांश, कर्जावरील व्याज आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या विक्रीतून कमावलेला नफा यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock Investment in Tata Investment corporation share price return on 15 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या