Stocks Investment | शेअर बाजारात गुंतवणूक करावी का? ही 7 कारणे तुम्हाला गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतील

Stocks investment| शेअर बाजारात गुंतवणूक करणे, हा कमाईचा सर्वात उत्तम आणि फायदेशीर मार्ग मानला जातो. तुमच्यात जोखीम घेण्याची क्षमता असेल आणि शेअर बाजाराचे मूलभूत ज्ञान असेल तर तुम्ही शेअर बाजारातून अप्रतिम पैसा कमवू शकता. गुंतवणुकदार आणि तज्ञांना असा विश्वास आहे की इतर कोणत्याही गुंतवणूक पर्यायापेक्षा आणि मालमत्तेपेक्षा शेअर मार्केट मधील गुंतवणूक दीर्घकाळात अधिक परतावा कमावून देते. काही प्रसंग अपवाद म्हणून सोडले तर हे बर्याच अंशी खरे आहे. त्यामुळे अल्प कालावधीत मोठा परतावा कमावण्यासाठी गुंतवणूक तज्ञ शेअर बाजारात पैसे लावण्याचा सल्ला देतात.
शेअर बाजारातून कमी कालावधीत भरघोस पैसा कमावण्यासाठी प्रचंड संयम आणि मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याच वेळी, जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून मोठा परतावा कमवायचा असेल तर शेअर बाजाराची शेअर बाजाराचे ज्ञान असणे आणि स्टॉकच्या चढ उतारांचे आकलन करण्याची क्षमता असणे फार गरजेचे आहे. तुम्हाला फक्त मजबूत स्टॉक शोधून त्यात गुंतवणूक करायची आहे, त्यातून 5-10 वर्षांनंतर तुम्हाला शानदार परतावा नक्की मिळेल. आज या लेखात आपण शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची 7 महत्वाची कारणे जाणून घेणार आहोत.
महागाई :
महागाई वाढणे म्हणजे नेमके काय? महागाई वाढली तर वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ होते. यामुळे कंपन्यांचा महसूल आणि उत्पन्न तर वाढतोच सोबत त्यांच्या नफ्यातही वाढ होते. नफ्यात वाढ झाली की त्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि किंमत वाढते, आणि त्यातून गुंतवणूकदार भरघोस पैसे कमावतात.
भारताची लोकसंख्या :
आपल्या देशाची लोकसंख्या आपली खरी ताकद आहे. देशाची लोकसंख्या वाढली की कंपन्यांच्या उत्पादनांची बाजारपेठ आणि मागणीही वाढते. ज्या कंपन्या मोठ्या लोकसंख्येसाठी उत्पादने तयार करतात, त्यांचे मूल्यांकन लोकसंख्येनुसार वाढत राहते.
तंत्रज्ञानाचा विकास :
देशाची लोकसंख्या जसजशी वाढत जाते, तसतसे तंत्रज्ञान विकास आणि वस्तूंची निर्मिती वाढत राहते. अशा परिस्थितीत, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपन्यांना मोठा फायदा होतो. लोकांनी जर या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर दीर्घकाळात ते मजबूत परतावा कमवू शकतात.
सर्वोत्तम निवडीचा पर्याय :
शेअर बाजारात अनेक निर्देशांक लिस्ट केले आहेत. त्यात ज्या स्टॉक चा समावेश होते, ते सर्वोत्तम कंपन्या मानल्या जातात. जर एखादी कंपनी सातत्याने खराब कामगिरी करत असेल, तर चांगली कामगिरी करणारी कंपनी तिला मागे टाकून निर्देशांकात स्थान घेते. अशा प्रकारे गुंतवणूकदाराकडे सर्वोत्तम स्टॉक निवडीचा पर्याय असतो.
दीर्घकालीन जोखमीचे फायदे :
जर तुम्ही शेअर बाजारात पुरेसे ज्ञान नसतात जोखीम घेऊन गुंतवणूक केली तर पैसे बुडण्याचा धोका जास्त असतो. परंतु दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक उत्तम परतावा कमावून देऊ शकते. जोखमीच्या बदल्यात मिळालेल्या नफ्याचा रिस्क प्रॉफिट म्हणतात.
RBI धोरणाचा परिणाम :
जेव्हा अर्थव्यवस्थेत सुस्ती की कमजोरी असते तेव्हा लोक पैसे खर्च करणे टाळतात आणि बचत करतात. आर्थिक व्यवहार नियंत्रित करण्यासाठी RBI व्याजदर कमी करून बँकेत ठेवलेल्या पैशावर कमी परतावा देते. यानंतर, लोक कमी परतावा असलेल्या ठिकाणी पैसे ठेवणे टाळतात आणि अधिक जोखीम घेऊन चांगला नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करतात.
15 टक्के वार्षिक परतावा :
फक्त शेअर बाजारात नेहमी घसरण किंवा फक्त वाढ होत नाही. शेअर बाजारात चढ उताराचे चक्र चालूच असते. दीर्घकालीन गुंतवणुकीत वाढ ही अल्पकालीन डाउनट्रेंडपेक्षा नेहमी जास्त असते. सेन्सेक्सच्या मागील 33 वर्षांच्या चार्ट पॅटर्नचे निरक्षण केल्यास आपल्याला समजेल की सेन्सेक्स ने वार्षिक 15 टक्के सरासरी चक्रवाढ पद्धतीने परतावा दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Stock investment reasons to invest in stock market without risk and loss on 13 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL