22 January 2025 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

Stock To Buy | हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाख रुपयांवर दिला 9.64 कोटी रुपये परतावा, पुढेही अफाट फायद्याचा

Stock To Buy

Stock To Buy | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. आज देखील या कंपनीचा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 241.30 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर अप्पर सर्किटसह 229.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 253.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनी जगातील सर्वोत्तम व्हिस्की बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या Indri Diwali 2023 Edition ला जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. 2023 या वर्षात पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 447.79 टक्के नफा कमावून दिला आहे.

11 जुलै 1997 रोजी पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 25 पैशांवर ट्रेड करत होते. तर या किमतीवरुन पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 96420 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 1997 मध्ये पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 9.64 कोटी रुपये झाले आहे.

ज्या लोकांनी 2023 या वर्षाच्या सुरुवातीला पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आतापर्यंत 447 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे साडेतीन पट वाढवले आहेत. या काळात पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 264 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock To Buy call on Piccadilly Agro Share Price 20 December 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x