23 December 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Stocks to Buy | गेल्या 1 महिन्यात या स्टॉक मध्ये चांगली वाढ, आता होणार नॉनस्टॉप वाढ, हे शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Stocks to Buy

Stocks to Buy | कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपण पाहिले असेल की शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. व्याज दरवाढीचे चक्र असेच सुरू राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काळात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत. अनियंत्रित वाढती महागाई, व्याज दर वाढ, जागतिक भू-राजकीय तणा, युद्ध आणि आंतरराष्ट्रीय वाद, विदेशी गुंतवणूकदारांनी सुरू केलेली विक्री हे सर्व घटक भारतीय शेअर बाजारावर दबाव टाकत आहेत.

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात थोडी रिकव्हरी दिसून आली होती पण ती फार काळ टिकली नाही. शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे. शेअर बाजार तज्ज्ञ गुंतवणूकदारांना सावध राहून गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. अश्या पडझडीच्या काळातही काही शेअर्समध्ये मजबूत ब्रेकआउट दिसून आला आहे. गेल्या 1 महिन्यात या स्टॉक मध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने आपल्या ग्राहकांसाठी अशा काही शेअर्सची यादी तयार केली आहे जे पुढील काळात चांगली कमाई करून देऊ शकतात.

1) भारती एअरटेल :
सध्याचा बाजार भाव : 799.60 रुपये
खरेदी कॉल किंमत : 792-776 रुपये
स्टॉप लॉस : 750 रुपये
अपेक्षीत वाढ : 10 टक्के -12 टक्के

साप्ताहिक चार्ट पॅटर्न चे निरीक्षण केले तर असे दिसेल की हा स्टॉक आयताकृती पॅटर्नमधून बाहेर पडला आहे. शेअर्स मध्ये 780-640 रुपये या श्रेणीत जास्त अधिग्रहण दिसून आले आहे. एअरेटेल मध्ये हे ब्रेकआउट जबरदस्त व्हॉल्यूम क्षमतेसह दिसून आले आहे, जे सकारात्मक वाढीचे लक्षण आहे. हा स्टॉक सध्या त्याच्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या SMA किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉक दररोज च्या ट्रेडिंगमध्ये टॉप आणि बॉटम्सला स्पर्श करत आहे. साप्ताहिक ट्रेडिंग तेजीमध्ये झाली आहे. हा शेअर पुढे येणाऱ्या काळात 860-880 रुपयांवर जाऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.

2) आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल :
सध्याचा बाजार भाव : 349 रुपये
खरेदी किंमत : 345-338 रुपये
स्टॉप लॉस : 315 रुपये
अपेक्षीत वाढ : 11 टक्के –13.टक्के

गेल्या आठवड्याच्या चार्ट पॅटर्नवर हा स्टॉक 320 रुपयांच्या क्षैतिज ट्रेंडलाइनमधून बाहेर आला आहे. स्टॉकमधील हे ब्रेकआउट जबरदस्त व्हॉल्यूमसह दिसून आले आहे, जे वाढत्या सहभागाचे सकारात्मक लक्षण आहे. हा स्टॉक सध्या 20, 50 आणि 100 दिवसांच्या SMA पातळीवर ट्रेड करताना दिसत आहे. दैनिक आणि साप्ताहिक निर्देशक तेजीमध्ये दिसून आला आहे. स्टॉक पुढील काळात 378 -385 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

3) गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्स :
सध्या बाजार भाव : 352 रुपये
खरेदी किंमत : 350-343 रुपये
स्टॉप लॉस : 320 रुपये
अपेक्षीत वाढ : 10 टक्के –13 टक्के

हा स्टॉक साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर सर्क्युलर बॉटम पॅटर्नमधून बाहेर आला आहे. या स्टॉकमधील ब्रेकआउट जबरदस्त व्हॉल्यूम संख्येने झालेले दिसून येत आहे, जे वाढत्या सकारात्मक वाढीचे लक्षण आहे. हा स्टॉक सध्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या SMA वर पातळीवर ट्रेड करत आहे. दैनिक आणि साप्ताहिक निर्देशक RSI तेजीमध्ये आहे. या स्टॉकची ट्रेडिंग किंमत पुढील येणाऱ्या काळात 380-390 रुपये पर्यंत जाऊ शकते.

4) गुजरात फ्लोरोकेमिकल्स :
सध्या बाजार भाव : 3949 टक्के
खरेदी किंमत : 3900-3822 रुपये
स्टॉप लॉस : 3680 रुकाये
अपेक्षीत वाढ : 10 टक्के -14 टक्के

गेल्या आठवड्याच्या चार्ट पॅटर्नवर हा स्टॉक सममितीय त्रिकोणी पॅटर्नमधून बाहेर आला असून सध्या स्टॉक 300 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. हा स्टॉक सध्या 20, 50, 100 आणि 200 डे SMA पातळीवर ट्रेड करत आहे. साप्ताहिक स्ट्रेंथ इंडिकेटर RSI मध्ये तेजी दिसून येत आहे. शेअरमध्ये पुढील काळात 4250-4400 रुपयेपर्यंत वाढ होऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to Buy recommended by Experts from various sectors with Target price and Stop loss on 4 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x