21 January 2025 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Stocks To Buy | अल्पावधीत होईल मोठी कमाई, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केल्याने स्टॉक मार्केट तेजीत वाढत आहे. यासह अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. Shyam Metalics Share Price

अशा तेजीच्या काळात शेअर बाजारातील गुंतवणूक सल्लागारांनी श्याम मेटॅलिक कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी श्याम मेटॅलिक कंपनीचे शेअर्स 2.02 टक्के वाढीसह 525.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, नोव्हेंबर 2023 हा महिना भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीने बराच चांगला गेला. नवीन क्षमतेच्या विस्तारामुळे मेटॅलिक व्हॉल्यूममध्ये सकारात्मक वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. सॉफ्ट लोहाच्या विक्रीच्या प्रमाणात वार्षिक आधारावर 3 पट वाढ पाहायला मिळाली आहे. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीचा महसूल स्थिर राहिला आहे.

श्याम मेटॅलिक कंपनीने आपल्या व्यवसाय वाढीसाठी 3900 कोटी रुपयेची व्यवसाय विस्तार योजना आखली आहे. ही रक्कम कंपनीद्वारे ब्लास्ट फर्नेस आणि कोक ओव्हनसाठी भांडवली खर्च केली जाणार आहे. या दोन्ही व्यवसाय विस्तार योजना सध्या 56 टक्के आणि 41 टक्के पूर्ण झाल्या आहेत. पुढील काळात कंपनीच्या उत्पादन व्हॉल्यूममध्ये सुधारणा होईल, असा विश्वास ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, श्याम मेटॅलिक्स कंपनीचे शेअर्स 690 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही लक्ष्य किंमत स्टॉकच्या सध्याच्या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 35 टक्के अधिक आहे. मागील एका आठवड्यात श्याम मेटॅलिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे.

मागील तीन महिन्यांत श्याम मेटॅलिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत श्याम मेटॅलिक स्टॉक 60 टक्के मजबूत झाला आहे. 2023 या वर्षात श्याम मेटॅलिक कंपनीच्या शेअरची किंमत 65 टक्के वर गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on Shyam Metalics Share Price 11 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x