17 April 2025 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Stocks To Buy | या सरकारी बँकेच्या शेअरने 6 महिन्यांत 55 टक्के परतावा दिला, आता अल्पावधीत मिळेल 21% परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या सरकारी बँकेच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे. Union Bank of India Share Price

या बँकेची कर्जवाढ मजबूत असून बँकेचे व्याज उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या या बँकेचा स्टॉक आउटलुक सकारात्मक आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉक 2.27 टक्के घसरणीसह 107.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर पुढील काळात 130 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 28 नोव्हेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 108 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या किमतीवरून हा स्टॉक 20-21 टक्के अधिक वाढू शकतो. 2023 या वर्षात युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉक 35 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 6 महिन्यांत युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेची व्यावसायिक कामगिरी मजबूत असून बँकेने नफ्यावर अधिक भर दिला आहे. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाने अंडररायटिंग मानके सुधारण्यासाठी आणि क्रेडिट तसेच ठेवींमध्ये वाढ करण्यासाठी अनेक सकारात्मक पाऊले उचलली आहेत. बँकेच्या NPA आणि बुडीत कर्जाचे निराकरण करण्यावर युनियन बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने अधिक लक्ष दिले आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया मागील काही तिमाहीपासून सकारात्मक कामगिरी करत आहे. मजबूत एनआयआय, निरोगी मार्जिन आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या कमाईत चांगली वाढ नोंदवली आहे. या बँकेचा नवीन एनपीए देखील कमी झाला आहे. बँकेची पुनर्प्राप्ती चांगली झाली आहे. म्हणून बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत देखील सुधारणा पाहायला मिळत आहे.

भविष्यात युनियन बँक ऑफ इंडिया बँक क्रेडिट वाढ सुधारण्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. आर्थिक वर्ष 2024-26 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या LAN ची वाढ 12 टक्के अपेक्षित आहे. आणि बँकेचे RoA/RoE आर्थिक वर्ष 2026 पर्यंत अनुक्रमे 1.2 टक्के/ 17.3 टक्के राहण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on Union Bank of India Share Price 30 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या