
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात निफ्टी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात FII ने भारतीय शेअर बाजारात 16707 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. आणि दुसऱ्या तिमाहीचे जीडीपी आकडे नुकताच जाहीर करण्यात आले आहे. कच्च्या तेलात किमती देखील मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली आहे.
परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजारात गुंतवणूक वाढवत आहेत. अशा परिस्थितीत तज्ञांनी गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी 2 सर्वोत्तम दर्जाचे सरकारी शेअर्स निवडले आहेत. यात गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना चांगला नफा मिळू शकतो.
सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7.6 दराने वाढत होती. आणि एफआयआयने भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून विचार केला तर आपल्याला समजेल की, भारतीय शेअर बाजारात सकारात्मक मजबुती पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी NBCC आणि इंजिनियर्स इंडिया या दोन सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
इंजिनियर्स इंडिया :
तज्ञांनी इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के घसरणीसह 156.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी प्रामुख्याने तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल्स क्षेत्रामध्ये व्यवसाय करते.
याशिवाय ही कंपनी अक्षय ऊर्जा, हरित ऊर्जा, कोळसा गॅसिफिकेशन क्षेत्रात देंखील व्यवसाय करते. तज्ञांच्या मते पुढील 9-12 महिन्यांमध्ये हा स्टॉक 225 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ही लक्ष किंमत शेअरच्या सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 50 टक्के अधिक आहे.
NBCC :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के घसरणीसह 77.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी प्रामुख्याने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, रिअल इस्टेट आणि ईपीसी म्हणजेच इंजिनिअरिंग प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन सेगमेंटमध्ये व्यवसाय करते.
तज्ञांनी या शेअरची लक्ष्य किंमत 85 रुपये निश्चित केली आहे. आणि 69 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांनी मजबूत झाले होते. तर मागील तीन महिन्यांत शेअर धारकांनी 41 टक्के मग कमावला होता. 2023 मध्ये या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 92 टक्के नफा कमावून दिला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























