21 January 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Stocks To Buy | फायद्याची मोठी संधी! हे दोन सरकारी शेअर्स 36 ते 50 टक्के परतावा देतील, यादी सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र आज शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणुकदारांना वित्त क्षेत्राशी संबंधित दोन सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून कमाई करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने PFC आणि REC या दोन्ही दोन सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या दोन्ही कंपन्या पॉवर सेक्टरला वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करतात. मागील तिमाहीत या दोन्ही सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्के ते 50 टक्केची वाढ पहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात PFC आणि REC या दोन्ही कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे.

आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी PFC कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के वाढीसह 399.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर REC कंपनीचे शेअर्स 2.36 टक्के वाढीसह 434.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. CLSA फर्मने PFC कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 360 रुपयेवरून वाढवून 490 रुपये केली आहे. म्हणजेच हा स्टॉक 36 टक्के अधिक वाढू शकतो.

17 जानेवारी 2024 रोजी PFC कंपनीचे शेअर 392 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी PFC स्टॉकची टारगेट मल्टिपल 0.90X वरून 1.4X पर्यंत वाढवली आहे. मागील एका वर्षात PFC कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट वाढली आहे. याच काळात गुंतवणूकदारांनी 110 टक्के परतावा कमावून दिला आहे.

CLSA फर्मने REC कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकची टार्गेट प्राइस 340 रुपयेवरून वाढवून 510 रुपये केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 50 टक्के अधिक वाढू शकतो. 17 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 426 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तज्ञांनी REC कंपनीचे टार्गेट मल्टिपल 1.1X वरून वाढवून 1.5X केले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 160 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

नुकताच वेदांता कंपनीने REC कंपनीची आर्थिक अडचणीत असणारी मीनाक्षी एनर्जी कंपनीचे अधिग्रहण केले आहे. यासाठी REC कंपनीला 1440 कोटी रुपये मिळाले आहे. भारत सरकारने विकलेल्या बहुतेक प्रकल्पांचे कर्जदाते पीएफसी आणि आरईसी या कंपन्या आहेत.

या दोन्ही सरकारी कंपन्यांची भांडवल पर्याप्तता प्रमाण मजबूत आहे. या दोन्ही कंपनीच्या 100 टक्के कर्जावर सरकारी हमी आहे. कंपन्यांचा ROE प्रोफाइल मजबूत आहे. दोन्ही कंपन्या SBI च्या तुलनेत 30-50 टक्के अधिक प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये SBI चा अंदाजित PB 1X आहे.

PFC आणि REC च्या तुलनेत SBI बँकेचा ROE खूप कमी आहे. PFC आणि REC या सरकारी कंपन्याचा ROE 20 टक्के आहे. तर SBI बँकेचा ROE 14 टक्के आहे. PFC आणि REC च्या कर्ज पुस्तकात पुढील 2 वर्षात 15.5 ची सरासरी वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 19 January 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x