18 April 2025 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Stocks To Buy | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर्स अल्पावधीत देतील 18 टक्के परतावा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस

Stocks To Buy

Stocks To Buy | एनएमडीसी लिमिटेड या भारतातील देशातील सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादक कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक ब्रोकरेज फर्म सकारात्मक पाहायला मिळत आहेत. एनएमडीसी लिमिटेड ही एक नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. सप्टेंबर 2023 या महिन्यात एनएमडीसी लिमिटेड कंपनीने लोह खनिजाच्या किमतीत प्रति टन 300 रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती.

या किंमत वाढीमुळे, ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवरील टार्गेट प्राईसमध्ये सुधारणा केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.37 टक्के वाढीसह 148.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात म्हंटले आहे की, एनएमडीसी कंपनीच्या ऑपरेशनल कामगिरीत सुधारणा पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या पाच महिन्यांत, लोह खनिज उत्पादन आणि विक्रीत कंपनीने वार्षिक अनुक्रमे 23 टक्के, 32 टक्के वाढ नोंदवली आहे. तज्ज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2024 मध्ये एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे उत्पादन प्रमाण 50 दशलक्ष टनच्या पार जाऊ शकते.

आर्थिक वर्ष 2023-26 या दरम्यान एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे लोहखनिज विक्रीचे प्रमाण 12 टक्के CAGR दराने वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच वर्षांत कंपनीचे उत्पादन 100 दशलक्ष टन पर्यंत वाढवण्याचे लक्ष आहे. परिणामी, आर्थिक वर्ष 2023-26 दरम्यान एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक CAGR 15 टक्के वाढ होऊ शकते.

एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या व्यापारातील वाढ पाहून ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर 175 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. या आठवड्यातील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत ही लक्ष्य किंमत 18 टक्के अधिक आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या शेअरवर 180 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

मागील एका आठवड्यात एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 41 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 33 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 02 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या