22 December 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 50 टक्के परतावा मिळेल, टार्गेट प्राईस पाहून फायदा घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | आज या लेखात आपण अशा तीन 3 स्टॉक्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही अल्पावधीत 50 टक्के नफा कमवू शकतात. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने आणि जिओजित बीएनपी परिबस हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हे तीन स्टॉक निवडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या तीन स्टॉक्सबद्दल..

शोभा लिमिटेड

ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 50 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या स्टॉकसाठी 1024 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मागील काही महिन्यात या कंपनीला ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते, म्हणून स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव वाढला होता. आता मात्र हा स्टॉक पुन्हा वाढीचे संकेत देत आहे. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के घसरणीसह 680.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या ऑटोमोटिव्ह पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉक बाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. जिओजित बीएनपी परिबास फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 134 रुपयेवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून तिमाहीत संवर्धन मदरसन कंपनीने मजबूत कामगिरी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 27 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

तज्ज्ञांच्या मते पुढील आर्थिक वर्षापासून या कंपनीचा महसूल1.4 अब्ज डॉलर्स वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 101.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुवोको व्हिस्टास कॉर्पोरेशन

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने या कंपनीच्या स्टॉक बाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. तज्ज्ञांनी या अहवालात कंपनीचे शेअर्स 475 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत 27 टक्के अधिक वाढू शकतात.

एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, 2022 ते 2025 या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीचा EBITDA म्हणजेच ऑपरेटिंग प्रॉफिट 28 टक्के वाढेल. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 372.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 11 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x