22 April 2025 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. जागतिक बँकिंग संकटामुळे शेअर बाजारात कमालीची अनिश्चितता वाढली आहे. महागाई आणि व्याज दरवाढीचे चक्र अजूनही सुरूच आहे. शेअर बाजारातील काही नकारात्मक वृत्त, देशांतर्गत आणि जागतिक नकारात्मक घटक, शेअर बाजारावर विपरीत परिणाम निर्माण करत आहे. कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी तुमच्यासाठी काही स्टॉक्स निवडले आहेत, जे 100 रुपयांपेक्षा स्वस्त आहेत, परंतु त्यांत मजबूत वाढ होऊ शकते. या शेअरमध्ये 57 टक्केपेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे.

Karur Vysya Bank :
* सध्याची किंमत : 97.50 रुपये
* लक्ष्य किंमत : 155 रुपये
* एकूण परतावा : 57 टक्के

ब्रोकरेज फर्म MK Global ने ‘करूर व्यास बँक’ स्टॉकवर 155 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. आजच्या 97.50 रुपये किंमतीनुसार हा स्टॉक 57 टक्के अधिक वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, केव्हीबी स्मॉल बँकिंग स्पेसमधील मजबूत स्थितीत आहे. उच्च तरतुदीनंतरही, या बँकेने डिसेंबर 2022 तिमाहीत 290 कोटी रुपये नफा कमावला होता. या बँकेचे मार्जिन विस्तारले असून मालमत्तेची गुणवत्ता देखील सुधारत आहे. बँकेचा एनएनपीए सध्या 1 टक्क्यांवर आला आहे. चालू चौथ्या तिमाहीत या शेअरचे ROA 1.35 टक्के राहू शकते.

एलटी फूड्स :
* सध्याची किंमत : 92.20 रुपये
* लक्ष्य किंमत : 120 रुपये
* एकूण परतावा : 30 टक्के

ब्रोकरेज फर्म जिओजितने ‘एलटी फूड्स’ कंपनीच्या स्टॉकवर 120 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. सध्याच्या 92.20 रुपयांच्या किंमतीनुसार हा स्टॉक 30 टक्के परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, बासमती तांदूळ, सेंद्रिय पदार्थ आणि तांदूळ-आधारित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारी ‘एलटी फूड्स’ विशेष कंपनी आहे. या कंपनीची पोहोच जगभरात 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. कंपनीची महसूल वाढ जबरदस्त असल्याने मार्जिनवरील दबाव कमी झाला आहे. वार्षिक आधारावर Q3FY23 मध्ये कंपनीने 30 टक्के अधिक महसूल संकलन केला होता. या कंपनीचे लक्ष सध्या वितरण आणि ब्रँडिंगवर केंद्रित आहे.

पीएनबी :
सध्याची किंमत : 45.50 रुपये
लक्ष्य किंमत : 64 रुपये
एकूण परतावा : 40 टक्के

ब्रोकरेज फर्म शेअरखानने ‘पंजाब नॅशनल बँक’ स्टॉकवर 64 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या 45.50 रुपये किंमतीनुसार हा स्टॉक 40 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, PNB बँकेच्या ROA मध्ये सुधारणा होत असून त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. कोर ROA मजबूत राहिल्याने बँकेच्या कर्जाची वाढ निरोगी राहण्याची शक्यता आहे. अदानी ग्रुपमधील घसरणीमुळे, अलीकडे बँकिंग स्टॉक देखील घसरले आहेत.

IDFC फर्स्ट बँक :
* सध्याची किंमत : 53.00 रुपये
* लक्ष्य किंमत : 70 रुपये
* एकूण परतावा : 25

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 70 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सध्याच्या 53 रुपयांच्या किंमतीनुसार 30 टक्के परतावा मिळेल. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ही बँक किरकोळ आणि व्यावसायिक कर्जाच्या माध्यमातून लोनबुक मजबूत करण्यावर लक्ष देत आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष 2023-25 ​​पर्यंत या बँकेच्या कर्जाची वाढ 30 टक्के CAGR अपेक्षित आहे. किरकोळ ठेवींमध्ये मागील 3 वर्षात 5 पट वाढ नोंदवली गेली आहे. पुढील काळात बँकेच्या NII मध्ये मजबूत वाढ अपेक्षित आहे. बँकेचा ताळेबंदही मजबूत राहण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for short term investment check details on 27 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या