23 November 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
x

Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड शेअर्स स्वस्त झाले, मोठ्या कराराच्या पार्श्वभूमीवर हा स्टॉक तेजीत आला, खरेदी करावा?

Subex Share Price

Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड या सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.72 टक्के वाढले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सुबेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ होण्याचे कारण म्हणेज, कंपनीने गुगल क्लाउड सोबतच्या भागीदारी केली आहे. ही बातमी येताच गुंतवणूकदारांनी सुबेक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.89 टक्के घसरणीसह 33.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर 28 रुपयेवरून वाढून 37 रुपयेवर पोहोचले होते, मात्र आता शेअर घसरून 33 रूपयेवर आला आहे. Subex Limited कंपनीने शुक्रवारी Google Cloud सोबत फसवणूक व्यवस्थापन सोल्यूशन संबंधित करार केल्याची बातमी जाहीर केली, आणि शुक्रवारी शेअर्स 20 टक्के वाढीसह 33.94 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार आणि सोमवार या 2 दिवसात सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28.13 रुपयेवरून वाढून 37.35 रुपयेवर पोहचले होते. 13 जुलै 2023 रोजी सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 3 वर्षात सुबेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 357 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुबेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 3 वर्षांत झपाट्याने वाढ पाहायला मिळाली आहे. 17 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17 जुलै 2023 रोजी 37.35 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील 3 वर्षांत सुबेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 357 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत सुबेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 556 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 48.24 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Subex Share Price today on 18 July 2023.

हॅशटॅग्स

Subex Share price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x