22 January 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

Sugar Company Shares | साखर कंपन्यांच्या शेअर्सनी बाजारात पुन्हा एकदा गोडवा मिसळला आहे, साखर कंपन्यांचे हे शेअर्स उसळी घेऊ लागले

Sugar Company Stocks

Sugar Company Shares | जेव्हा जेव्हा शेअर मार्केटमध्ये पडझड होते, तेव्हा सर्वात आधी शुगर स्टॉक तेजीत येतात असे तज्ञ नेहमी म्हणतात. शेअर बाजारात अनेक साखर उद्योगाशी संबंधित शेअर्स ट्रेड करत आहेत, त्यापैकी आपण सर्वाधिक परतावा देणाऱ्या श्रीरेणुका शुगरच्या शेअर्स बद्दल माहिती घेणार आहोत. श्रीरेणुका शुगरच्या शेअर्सने NSE निर्देशांकावर इतर शुगर स्टॉक तुलनेत सर्वाधिक म्हणजे 12.39 टक्के परतावा दिला आहे. याशिवाय धामपूर शुगर कंपनीच्या शेअरने 6.08 टक्के परतावा दिला आहे, बजाज हिंदुस्थान कंपनीच्या स्टॉकने 5.5 टक्के आणि राणा शुगर कंपनीने 5.12 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

साखर कंपन्यांचे शेअर्स पडझडीनंतर तेजीत येताना दिसत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये श्रीरेणुका शुगरच्या शेअर्सने NSE निर्देशांकावर आपल्या श्रेणीतील इतर स्टॉकच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजे जवळपास 12.39 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. याशिवाय गुंतवणूकदारांनी धामपूर शुगर कंपनीच्या स्तोकने आपल्या गुंतवणूकदारांना 6.08 टक्के, बजाज हिंदुस्थान कंपनीच्या स्टॉकने 5.5 टक्के, आणि राणा शुगरने 5.12 टक्के नफा कमावला आहे.

इतर शुगर स्टॉकचा परतावा : गुंतवणूकदारांनी या साखर क्षेत्रातील कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावला आहे.

कंपनीचे नाव आणि दिलेला परतावा
* उत्तम शुगर कंपनीने : 4.48 टक्के,
* पोन्नी शुगर : 4.43 टक्के,
* अवध शुगर : 4.21 आणि
* बलरामपूर चिनी : 4 टक्के

तोट्यात असलेलं शेअर्स :
धारणी शुगर, कोठारी आणि त्रिवेणी इंजिनिअरिंग हे शुगर स्टॉक तोट्यात ट्रेडिंग करत आहेत.

जर आपण श्रीरेणुका शुगरच्या चार्ट पॅटर्न चे निरीक्षण केले तर असे दिसेल की एका आठवड्यात या स्टॉकमध्ये 9.93 टक्के पाहायला मिळाली आहे. 1 महिन्यात शेअरमध्ये 23.96 टक्के वाढ झाली असून गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला आहे. श्रीरेणुका शुगर या शेअरच्या किमतीत मागील 3 महिन्यांत 35.66 टक्के नोंदवली गेली आहे. मागील सहा महिन्यात गुंतवणूकदारांनी श्रीरेणुका कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून 49.59 टक्क्यांचा नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sugar company stock has bounced back and given amazing returns on investment on 22 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x