18 November 2024 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Sungarner Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सनगार्नर एनर्जी IPO शेअर्सनी लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 200% परतवा दिला, खरेदी करणार?

Sungarner Share Price

Sungarner Share Price | नुकताच भारतीय शेअर बाजारात सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले आहेत. वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त ट्रेडिंग करत आहेत. सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स SME प्लॅटफॉर्ममधील NSE-Emerge इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आणि स्टॉक 275 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Sungarner Energies Share Price)

सनगार्नर एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सने आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 331 टक्के नफा मिळवून दिला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 83 रुपये निश्चित केली होती. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 200 टक्के पेक्षा प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आणि काही वेळात हा स्टॉक 262.35 रुपये किमतीवर पोहचला होता.

स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी IPO किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 216 टक्के वाढली होती. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 275.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 6.4 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकून 5.31 कोटी भांडवल उभारणी केली होती. या कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला कोटा 193 पट सबस्क्राईब झाला होता. आणि या कंपनीचा संपूर्ण IPO एकूण 152.40 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या IPO साठी मुख्य व्यवस्थापक म्हणून फास्ट ट्रॅक फिनसेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त केले होते. आणि रजिस्ट्रार म्हणून स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त केले होते.

सनगार्नर एनर्जी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः सौर ऊर्जा, UPS, बॅटरी, इन्व्हर्टर आणि सौर पॅनेलसाठी डिझाइन आणि अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करण्यासाठी WMI कोड देखील प्राप्त केला आहे. मात्र कंपनीचे वाहन निर्मितीचे अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात सनगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीने 1.68 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीने 74.30 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sungarner Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

Sungarner Energies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x