5 January 2025 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरची किंमत लवकरच 'या' पातळीवर जाऊ शकते, स्टॉक खरेदी तुफान वाढली

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा एकत्रित निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून, कंपनीने 78.28 कोटी रुपये नफा कमावला आहे. कंपनीने आपल्या खर्चात काळात केल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)

‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने गुरुवारी स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले की, मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीला 36.77 कोटी रुपयांनी नफा कमी झाला होता. आयआयएफएलचे तज्ञ म्हणतात की, या कंपनीचे शेअर्स तांत्रिक चार्टवर सकारात्मक संकेत दर्शवत आहेत, मात्र त्यात अजूनही कमजोरी आहे. या स्टॉकमध्ये 10 रुपये किमतीवर जबरदस्त प्रतिकार लेव्हल तयार झाली आहे. जर या स्टॉकने 10 रुपये किंमत पातळी ओलांडली तर स्टॉक 13 ते 15 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

तथापि समीक्षाधीन तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे एकूण उत्पन्न 1,615 कोटी रुपयांवरून 1,464 कोटी रुपयांवर आले आहे, अशी माहिती सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवली आहे. त्याच वेळी कंपनीच्या खर्चात कपात झाली असून, कंपनीने आपला एकूण खर्च 1,386 कोटी रुपयांवर आणला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 1,573 कोटी रुपये होता.

एका निवेदनात, सुझलॉन एनर्जी समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी माहिती दिली आहे की, “2023 वर्षाची सुरुवात पवन ऊर्जा क्षेत्रासाठी धोरणात्मक घोषणांसह अतिशय उत्साहवर्धक सुरुवातीसह झाली आहे. भारतीय पवन ऊर्जा क्षेत्र भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या मार्गावर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price 532667 stock market live on 11 February 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x