22 November 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये अद्भूत तेजी, स्टॉक आज 15 टक्के वाढला, सुसाट तेजीचं नेमकं कारण काय?

Highlights:

  • Suzlon Energy Share Price
  • मे महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने 45 टक्के परतावा दिला
  • सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये कमालीची तेजी
  • सुझलॉन एनर्जी स्टॉक वाढीचे कारण
Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत पाहायला मिळत आहेत. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अनेक चांगल्या बातम्या आल्याने स्टॉकमध्ये उसळी पाहायला मिळत आहे. या सर्व सकारात्मक बातम्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या गुंतवणुकदारांना देखील मोठा फायदा होत आहे.

मे महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने 45 टक्के परतावा दिला

मे महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. तसेच आजही हा स्टॉक कमालीच्या तेजीत वाढत आहे. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.98 टक्के वाढीसह 14.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये कमालीची तेजी

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 12.14 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. 20 डिसेंबर 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 12.19 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.43 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचंक किमतीवर ट्रेड करत होते. एकेकाळी सुझलॉन कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर हा स्टॉक सुमारे 96 टक्क्यांनी घसरला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने चांगली सुधारणा केली आहे.

सुझलॉन एनर्जी स्टॉक वाढीचे कारण

मागील महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनी अनेक नवीन ऑर्डर्स मिळाल्या होत्या. आणि त्यामुळे स्टॉकमध्ये री-बाउंड पाहायला मिळाला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच 20 GW ची स्थापित पवन टर्बाइन क्षमता प्राप्त केली आहे. सुझलॉन एनर्जी समूहाने जगभरात सहा खंडांमध्ये पसरलेल्या 17 देशांमध्ये बसवलेल्या 12467 पवन टर्बाइनद्वारे 20 GW पवन ऊर्जा क्षमता प्राप्त केली आहे.

जागतिक पवन ऊर्जेच्या दृष्टीकोनात सुझलॉन एनर्जी कंपनीला आघाडीची कंपनी मानले जात आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने 1995 मधे 270 KW क्षमतेची पहिली टर्बाइन स्थापित केली होती. तर तेव्हापासून 2023 पर्यंत कंपनीचा 3 MW टर्बाइनपर्यंत प्रवास थक्क करणारा आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये एकूण 5900 कर्मचारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Energy Share Price today on 07 June 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x