Suzlon Energy Share Price | 'सुझलॉन एनर्जी' शेअर वाढीचे कारण काय? शेअरची किंमत 10 रुपयेपेक्षा स्वस्त, कंपनीबद्दल सकारात्मक बातमी
Highlights:
- सुझलॉन एनर्जी स्टॉकमधील तेजीचे कारण
- विंड टर्बाइन पुरवठा कराराचा तपशील
- गुंतवणुकीवर परतावा
- तीन महिन्यांत 12 टक्के परतावा

Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीला एका मागून एक मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह 9.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कंपनीने देखील 11200 कोटी रुपयेचा टप्पा पार केला आहे. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.70 टक्के वाढीसह 9.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सुझलॉन एनर्जी स्टॉकमधील तेजीचे कारण :
सुझलॉन एनर्जी कंपनी मागील एका महिन्यात 5 मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीने सोमवारी जाहीर केले की त्यांना सेरांटिका रिन्युएबल्स कंपनीकडून 3 मेगावॅट क्षमतेच्या पवन चक्की टर्बाइनची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरमध्ये कर्नाटकातील कोप्पल येथे सेरांटिकाच्या आगामी 204 मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी प्रत्येकी 3 मेगावॅट क्षमतेचे हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवरसह 68 विंड टर्बाइन जनरेटर स्थापित करण्याची ऑर्डर आहे. या कंपनीने अद्याप आपले ऑर्डरचे मूल्य जाहीर केले नाही.
विंड टर्बाइन पुरवठा कराराचा तपशील :
सुझलॉन एनर्जी कंपनी या करारा अंतर्गत विंड टर्बाइनचा पुरवठा करणार आहे. यासोबतच कंपनी उत्पादन आणि कमिशनिंगचे काम देखील करणार आहे. त्याच वेळी प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, कंपनी ऑपरेशन आणि देखभाल सेवा प्रदान करेल, असे करारात म्हंटले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या मोठ्या पवन ऊर्जा प्रकल्प अंतर्गत 168 हजार घरांना वीज पुरवठा केला जाईल. यासह वार्षिक 6.63 लाख टन CO2 उत्सर्जन कमी होईल.
गुंतवणुकीवर परतावा :
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 13 टक्के मजबूत झले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील.
तीन महिन्यांत 12 टक्के परतावा
तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 270 टक्के कमाई केली आहे. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर्स 350 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आया शेअरची किंमत 90 टक्के खाली आली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Energy Share Price today on 23 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
The share price of any stocks is volatile and keeps changing throughout the day owing to different factors. Suzlon Energy share price is Rs.9.50 as of 23 May ’23.
Market capitalization, short for market cap, is the market value of a publicly traded company’s outstanding shares. The market cap of Suzlon Energy is Rs.11,000 Cr as of 23 May ’23.
सुझलॉन एनर्जीच्या शेअरची समस्या अशी आहे की, मागील इतिहासानुसार सुझलॉन एनर्जी शेअर्सच्या किंमतीत कधीही विश्वासार्ह तेजी दिसून आली नाही आणि थोड्या कालावधीतील तेजी पाहिल्यानंतर तेजी कमी होते, हे स्पष्ट होते. यावेळी सुझलॉन एनर्जी हा तीन ते सहा महिन्यांचा होल्डिंग पीरियड असलेल्या मध्यम मुदतीच्या खेळासाठी चांगला सेटअप ठरू शकतो.
आपण सुझलॉन एनर्जी शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.
सुझलॉन एनर्जीचे पीई आणि पीबी गुणोत्तर 25 मे 2023 पर्यंत 4.61288 आणि एनए आहे.
52 आठवड्यांची उच्च / नीचांकी किंमत ही सर्वोच्च आणि सर्वात कमी किंमत आहे ज्यावर सुझलॉन एनर्जी स्टॉकने त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखे) व्यवहार केला आहे आणि तांत्रिक सूचक मानला जातो. 25 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जीचे 52 आठवड्यांचे उच्चांकी आणि निम्न रु.12.15 आणि रु.5.42 आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC