6 November 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरने 1 महिन्यात 31.48% परतावा दिला, कंपनीला 6 ऑर्डर मिळाल्या, 10 रुपयाचा शेअर तेजीत

Highlights:

  • Suzlon Energy Share Price
  • 1 महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने  31.48 टक्के परतावा दिला
  • सुझलॉन एनर्जी कंपनीला 6 नवीन ऑर्डर मिळाल्या
  • आज तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होणार
  • स्टॉकची किंमत 98 टक्क्यांनी कमजोर
Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | मागील एक महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.

1 महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने  31.48 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 31.48 टक्के परतावा कमवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 10.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीला 6 नवीन ऑर्डर मिळाल्या

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला 6 नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. टोरेंट ग्रुपकडून सुझलॉन एनर्जी कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत सुझलॉन कंपनी 100 विंड टर्बाइन जनरेटर, हायब्रिड लॅटिस टनुब्युलर टॉवरसह प्रत्येकी 3 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा केंद्र स्थापित करणार आहे.

हा प्रलंबित प्रकल्प कर्नाटक राज्यात उभारण्यात येणार आहे. टोरेट ग्रुपने सुझलॉन एनर्जी कंपनीला 3 मेगावॉट क्षमतेचे सीरीज विंड टर्बाइनची उभारण्याची सर्वात मोठी ऑर्डर देखील दिली आहे.

आज तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होणार

सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे 2023 रोजी होणार आहे. या बैठकीत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जाणार आहे. यासोबतच संपूर्ण आर्थिक वर्षातील निकालांबाबत चर्च केली जाणार आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा संबंधित सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी पवन ऊर्जा टर्बाइनचे उत्पादन देखील करते.

स्टॉकची किंमत 98 टक्क्यांनी कमजोर

एकेकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता स्टॉक 10 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे. मागील 15 वर्षात या स्टॉकची किंमत 98 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 28 जुलै 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5.43 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 12.19 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price today on 30 May 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x