14 January 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पण स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, स्टॉक BUY करावा का - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: Suzlon – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • कंपनीचा बाजार हिस्सा 35 ते 40% वाढू शकतो
  • इतर पॉवर स्टॉकची टारगेट प्राईस – SUZLON Share
  • सुझलॉन एनर्जी कंपनीची माहिती – NSE:SUZLON
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. नुकताच ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: Suzlon) शेअर्सची रेटिंग डाऊनग्रेड केली आहे. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 81 रुपये किमतीच्या खाली आले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

वास्तविक, ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकची रेटिंग ‘ओव्हरवेट’ वरून डाऊनग्रेड करून ‘इक्वलवेट’ केली आहे. यासह तज्ञांनी शेअरची टारगेट प्राईस 88 रुपये निश्चित केली होती. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 217 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 111 टक्के वाढली होती. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 79.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीचा बाजार हिस्सा 35 ते 40% वाढू शकतो
मॉर्गन स्टॅनलीने आपल्या नवीन अहवालात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या रेकॉर्ड-हाय ऑर्डर बुकवर फोकस केला आहे. सुझलॉन एनर्जीची ऑर्डर बुक 5GW वर पोहोचली आहे. तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचा बाजार हिस्सा 35 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतो. 2025-30 मध्ये नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नवीन ऑर्डरच्या प्राप्तीमध्ये 32GW क्षमतेची आवक होण्याची अपेक्षा आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण केले होते. यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीला मल्टी-ब्रँड O&M व्यवसायात प्रवेश करता आला.

इतर पॉवर स्टॉकची टारगेट प्राईस :
मॉर्गन स्टॅनलीने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची रेटिंग आणि टारगेट प्राईस देखील बदलली आहे. या स्टॉकची रेटिंग तज्ञांनी ‘अंडरवेट’ वरून ‘ओव्हरवेट’ अशी अपग्रेड केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 577 रुपये किमतीवर जाऊ शकतो. याशिवाय तज्ञांनी NTPC स्टॉकची रेटिंग ‘ओव्हरवेट’ ठेवली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 496 रुपये किमतीवर जाऊ शकतो. यासह तज्ञांनी पॉवर ग्रिड स्टॉकची टारगेट प्राईस 296 रुपयेवरून वाढवून 362 रुपये केली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीची माहिती :
सुझलॉन एनर्जी कंपनीची स्थापना 1995 साली झाली होती. सुझलॉन एनर्जी ही कंपनी भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्रातील पुणे शहरात आहे. ही कंपनी जगातील आघाडीच्या टर्बाइन उत्पादक कंपन्यांमध्ये अग्रणी मानली जाते. जागतिक स्तरावर देखील या कंपनीने आपले मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे. ही कंपनी भारतात कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि पर्यावरणास अनुकूल असे ऊर्जा निर्मिती पर्याय शोधण्यासाठी काम करत आहे. भारताच्या टर्बाइन मार्केटमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने 32 टक्के वाटा काबीज केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(292)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x