11 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला कर्नाटकातील जिंदाल रिन्युएबल्स कंपनीकडून ३०२.४ मेगावॅट पवनऊर्जेचा कॉन्ट्रॅक्ट (SGX Nifty) मिळाला आहे. जिंदाल रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या जेएसपी ग्रीन विंड वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देशातील हरित पोलाद उत्पादनाला गती देण्यासाठी कर्नाटकातील कोप्पल भागातील ३०२.४ मेगावॅट पवनऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

सुझलॉन शेअरची सध्याची स्थिती

बुधवार 04 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 4.24 टक्के वाढून 68.17 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 86.04 रुपये आणि शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 86.04 रुपये होता. सध्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 91,964 कोटी रुपये आहे.

सुझलॉन शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती

सीएनबीसी आवाज वृत्तवाहिनीच्या तज्ज्ञांनी सांगितले की, ‘जर सुझलॉन एनर्जी शेअर 66 रुपयांच्या वर राहिला तर शॉर्ट टर्म तो 85-90 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आठवड्यात शेअर 72 रुपयांच्या वर बंद झाल्यास मोठी तेजी अपेक्षित आहे, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. सुझलॉन एनर्जी शेअरसाठी पाच पैकी तीन विश्लेषकांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे, तर इतर दोन विश्लेषकांनी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे.

कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

सुझलॉन एनर्जीला वर्षातील सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच सुझलॉन एनर्जीच्या एकूण ऑर्डर-बुक’मध्ये सी अँड आय ग्राहकांचा वाटा आता 56% आहे, जो 5.4 गिगावॅटच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी हायब्रीड लॅट्स (एचएलटी) टॉवरसह 96 अत्याधुनिक एस 144 विंड टर्बाइन जनरेटर पुरवणार आहे. या जनरेटरची क्षमता प्रत्येकी 3.15 मेगावॅट आहे.

२१ नोव्हेंबर रोजी सीएनबीसी-टीव्ही १८ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सुझलॉन एनर्जी ग्रुपचे सीईओ जेपी चलसानी यांनी सांगितले की, ‘सुझलॉन कंपनीसाठी सध्याचे ऑर्डरबुक येत्या १८ ते २४ महिन्यांत पूर्ण होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(290)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x