15 January 2025 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: Suzlon – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • स्टॉक घसरणीचे कारण
  • शेअर्सची कामगिरी
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर रोजी सुमारे 5 टक्क्यांनी घसरले होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. नुकताच या कंपनीला (NSE: Suzlon) सेबीने चेतावणी पत्र जारी केले आहेत. याशिवाय शेअर्सच्या घसरणीचे आणखी एक कारण म्हणजे मध्यपूर्वे आशियामध्ये इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये तणाव वाढत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.03 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.33 टक्के घसरणीसह 74.74 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

स्टॉक घसरणीचे कारण
नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने आवश्यक प्रकटीकरण नियम म्हणजेच LODR चे पालन केले नाही, त्यामुळे कंपनीला सेबीने नोटीस बजावली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना आश्वासन दिले आहे की, या नोटीसचा आर्थिक किंवा ऑपरेशनल कामगिरीवर परिणाम होणार नाही. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लीने सुझलॉन एनर्जी स्टॉकची रेटिंग ‘ओव्हरवेट’ वरून डाऊनग्रेड करून ‘इक्वलवेट’ केली आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 73 रुपयेवरून 88 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

शेअर्सची कामगिरी
मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 181.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 98.15 टक्के वाढला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे मुख्यालय पुणे शहरात आहे. सुझलॉन समूह जगभरात 17 देशांमध्ये व्यवसाय करतो. या कंपनीची स्थापित पवन ऊर्जा क्षमता 20.8 GW आहे. उच्च महसुल संकलनामुळे जून 2024 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा PAT तिप्पट होऊन 302 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(292)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x