5 October 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Korean Hair Care Tips | साऊथ कोरियाच्या मुलींसारखे सिल्की हेअर हवेत, मग ट्राय करा हा मॅजिकल शाम्पू - Marathi News IREDA Share Price | आता नाही थांबणार, IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News Senior Citizen Saving Scheme | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा, 5 वर्षांत कमवाल व्याजाचे 12 लाख रुपये - Marathi News My EPF Money | खाजगी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, EPF योगदान मर्यादा वाढणार, EPF ची अधिक रक्कम मिळणार - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर देणार ब्रेकआऊट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, स्टॉकला BUY रेटिंग - Marathi News
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन कंपनी अंश
  • एक्स्चेंजने कंपनीबाबत काय म्हटले
  • एक्स्चेंजने कोणते निर्देश दिले
  • स्टॉक चार्टवर कोणते संकेत
Suzlon Share Price

Suzlon Share Price | जागतिक घडामोडींमुळे सध्या शेअर बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. दरम्यान, शुक्रवारी सुझलॉन शेअरमध्ये (NSE: SUZLON) मोठी घसरण झाली होती. शुक्रवारी हा शेअर हा शेअर 1.33% घसरून 74.74 रुपयांवर क्लोज झाला होता. मागील एका आठवड्यात सुझलॉन शेअरमध्ये 8.16% घसरण झाली आहे. मागील १ महिन्यात शेअर -1.66% इतका घसरला आहे. (सुझलॉन कंपनी अंश)

एक्स्चेंजने कंपनीबाबत काय म्हटले
सुझलॉन कंपनीला बीएसई आणि एनएसईकडून महत्वाचे पत्र प्राप्त झाले आहे. एक्स्चेंजने म्हटल्यानुसार, ‘राजीनामा देणाऱ्या कंपनीच्या स्वतंत्र संचालकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सुझलॉन कंपनीकडून मिळालेली उत्तरे आणि कागदपत्रांचा आढावा घेतला असता, कंपनीकडून कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या चांगल्या प्रकारे पालन करता आले असते, असं एक्स्चेंजने म्हटले आहे.

एक्स्चेंजने कोणते निर्देश दिले
एक्स्चेंजने म्हटले आहे की “कंपनीकडून वरील नियमांचे पालन न करण्याकडे गांभीर्याने पाहिले जाते. सुझलॉन कंपनीने याबाबत भविष्यात योग्य ती सावधगिरी बाळगावी, योग्य ती खबरदारी घ्यावी आणि अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सकारात्मक पावले उचलावी जेणेकरून सेबी एलओडीआरच्या लागू तरतुदींचे योग्य पालन केले जाईल. मात्र भविष्यात अशाप्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असेही एक्स्चेंजने म्हटले आहे.

स्टॉक चार्टवर कोणते संकेत
सुझलॉन कंपनी स्टॉकच्या दैनंदिन चार्टवर ‘मंदी’चे संकेत दिसत आहेत. याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, सुझलॉन एनर्जीच्या शेअर दैनंदिन चार्टवर मंदीचे स्पष्ट संकेत दिसत असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे येत्या काळात हा शेअर 68 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

शुक्रवारी बीएसईवर सुमारे 65.92 लाख शेअर्स ट्रेड झाल्याचे आकडेवारी सांगते आहे. विशेष म्हणजे हा आकडा दोन आठवड्यांच्या सरासरी 51.88 लाख कोटी शेअर्सपेक्षा अधिक आहे. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे एकूण बाजारभांडवल 1,03,359.31 कोटी रुपये इतके आहे.

बीएसईच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कंपनीच्या शेअरचे प्राइस टू इक्विटी (P/E) गुणोत्तर 506.91 इतके आहे, तर प्राइस टू बुक (P/B) मूल्य 30.09 इतके आहे. प्रति शेअर उत्पन्न (EPS) 0.16 असून इक्विटीवरील परतावा (RoE) 5.95 इतका आहे. दरम्यान, जून 2024 पर्यंत कंपनी प्रवर्तकांचा हिस्सा 13.27% होता, जो मागील तिमाहीच्या तुलनेत 13.29 टक्क्यांपेक्षा थोडा कमी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(229)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x