15 January 2025 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश
  • नेमकं प्रकरण काय आहे
  • शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ
  • कंपनीच्या शेअर्सची स्थिती
Suzlon Share Price

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर्समध्ये मागील काही दिवस सलग घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी देखील सुझलॉन (NSE: SUZLON) शेअर्स 5.01% घसरून 70.9 रुपयांवर बंद झाले. विशेष म्हणजे मागील ५ ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन स्टॉकमध्ये 12% घसरण झाली आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.34 टक्के वाढून 73.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

दरम्यान, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण होण्यामागे प्रमुख कारण या कंपनीला बीएसई आणि एनएसई’कडून देण्यात आलेलं ‘अ‍ॅडव्हायझरी वॉर्निंग लेटर’.

नेमकं प्रकरण काय आहे
या ‘अ‍ॅडव्हायझरी वॉर्निंग लेटर’ नुसार, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे स्वतंत्र संचालक मार्क देशेडेलार यांच्या राजीनाम्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतींविषयी मोठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कंपनी प्रशासनाच्या निकषांचे पालन न करण्याकडे भविष्यात गांभीर्याने पाहिले जाईल, यावर NSE आणि BSE ने भर दिला आहे. दुसरीकडे, सुझलॉन एनर्जीने लिमिटेड कंपनीने याबाबत निवेदन देताना म्हटले आहे की, या लेटर आणि त्यातील मुद्द्यांचा कंपनीच्या आर्थिक किंवा ऑपरेशनल क्रियाकलापांवर कोणताही थेट परिणाम होणार नाही.

शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ
दरम्यान, सुझलॉन शेअरच्या घसरत्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. कारण सुझलॉन शेअर त्याच्या 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस आणि 50-दिवसांच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेज (एसएमए) पेक्षा खाली ट्रेड करत आहे. तर शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) सध्या 41.76 वर आहे, जे सूचित करते की सुझलॉन एनर्जी शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ आहे. विशेष म्हणजे सुझलॉन एनर्जी शेअरची प्राईस नजीकच्या काळात 68 रुपयांपर्यंत घसरण्याचा अंदाज स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती
मागील 1 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 156% परतावा दिला आहे. म्हणजे सुझलॉन शेअरने शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मात्र त्या तुलनेत याच कालावधीत निफ्टी 28 टक्क्यांनी वधारला आहे. मागील 5 वर्षांत सुझलॉन शेअरने 2800% परतावा दिला आहे. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे एकूण मार्केट कॅप 95,949 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(292)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x