18 January 2025 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये 100 अंकांची घसरण होऊन तो 23200 वर बंद झाला होता. तर सेन्सेक्स सुद्धा ४०० अंकांच्या घसरणीसह ७६६०० वर पोहोचला होता. या घसरणीत स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या या संकेतांमुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढणार आहे.

सुझलॉन कंपनी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 0.21 टक्क्यांनी घसरून 56.99 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 35.50 रुपये होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 76,932 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

शेअर बाजार विश्लेषक अरुण मंत्री यांनी सुझलॉन एनर्जी कंपनी स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला देताना म्हटले की, ‘टेक्निकल चार्टवर सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरला ५३ ते ५४ रुपयांच्या पातळीवर सपोर्ट आहे. मात्र, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर या लेव्हल’वरून घसरल्यास पुढे अजून घसरण होऊ शकते असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते ही पातळी गुंतवणूकदारांसाठी महत्वाची ठरणार आहे. सुझलॉन शेअर गुंतवणूकदारांनी ५२ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा असा संकेत तज्ज्ञांनी दिला आहे. सुझलॉन शेअर या पातळीवरून खाली गेल्यास पुढे मोठी घसरण होऊ शकते असे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने 1.30% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात सुझलॉन शेअर 18.07% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 2.89% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 39.34% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 2,377.83% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअर 53.95% घसरला आहे. मात्र YTD आधारावर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 12.77% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(294)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x