18 November 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर प्राईस नव्या टार्गेटच्या दिशेने, किती होईल फायदा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 2010 नंतर प्रथमच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीजवळ पोहोचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील काही दिवसापासून विविध म्युच्युअल फंडांनी आपले शेअर्स विकायला सुरुवात केल्याने सुझलॉन एनर्जी स्टॉक विक्रीच्या दबावात आला होता. मात्र शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.88 टक्के वाढीसह 38.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला 100.8 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे.

गुजरात ऊर्जा विकास महामंडळाने सुझलॉन एनर्जी कंपनीला ही ऑर्डर दिली आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये फेरबदल केल्याने नोव्हेंबर 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक विक्रीच्या दबावात आला होता. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांनी नोव्हेंबर 2023 या महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे 1,090 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले होत.

दरम्यान, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स AMFI च्या अर्धवार्षिक श्रेणीतील मिडकॅप शेअर्सच्या लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे. AMFI द्वारे हा अधिकृत बदल जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाईल. याची अमलबजावणी फेब्रुवारी 2024 ते जुलै 2024 पर्यंत लागू राहील. HDFC MF ने आपले सुझलॉन एनर्जी कंपनीचे सर्व शेअर्स विकले आहेत. तर बंधन MF ने सुझलॉन एनर्जी कंपनीचे 264 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले आहेत. तर Edelweiss MF ने 118 कोटी आणि Invesco MF ने 70 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 16 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x