18 November 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स आजही मजबूत तेजीत, कंपनीत भरघोस गुंतवणुकीचे आगमन होणार, वेगात पैसा वाढणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील सुझलॉन एनर्जी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉक MSCI ग्लोबल इंडेक्समध्ये सामील झाला असल्याने, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.

आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.51 टक्के वाढीसह 44.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.96 रुपये होती.

नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सुझलॉन एनर्जी स्टॉक MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये सामील झाल्याने, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 289 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते. तर IIFL अल्टरनेटिव्ह फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, या कंपनीच्या शेअर्समध्ये 241 दशलक्ष डॉलर्सचा ओघ येऊ शकतो.

MCSI निर्देशांकात सामील करण्यात आलेल्या नऊ शेअर्समध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. याव्यतिरिक्त असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया सुझलॉन एनर्जी स्टॉकला स्मॉलकॅप स्टॉक वरून मिडकॅप स्टॉक म्हणून अपग्रेड केले आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 390 टक्के नफा कमावून दिला आहे. 15 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 395 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 40.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 28.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता 40.50 रुपयेच्या पार गेले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 17 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x