18 November 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुझलॉन एनर्जी शेअरसाठी तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर करा, मालामाल व्हा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 30 रुपयेच्या आसपासच ट्रेड करत आहेत.

एकेकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 460 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.00 टक्के घसरणीसह 31.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

भारतात पूर्वी पवन ऊर्जेबद्दल फारशी चर्चा होत नव्हती, त्यावेळी सुझलॉन एनर्जी कंपनी या व्यवसायात उतरली होती. उत्कृष्ट तंत्रज्ञानामुळे कंपनीने खूप वेगाने प्रगती केली होती. मात्र त्यासाठी कंपनी सतत कर्ज घेत राहिली आणि मग कर्जाची परतफेड करण्यात कंपनीला कठीण होऊ लागले. येथूनच कंपनीच्या आर्थिक अडचणीची सुरुवात झाली होती. या कंपनीचा शेअर एकेकाळी 460 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यांनतर हा स्टॉक 1 ते 2 रुपये किमतीवर आला.

मात्र सुझलॉन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकांनी जिद्द सोडली नाही. कंपनीने कर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीची सर्वात मोठी समस्या सोडवली. सध्या सुझलॉन एनर्जी ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त बनली आहे. अशा परिस्थितीत या कंपनीचे शेअर्स पुन्हा 460 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

सुझलॉन एनर्जी कंपनीने कर्जाची समस्या सोडवण्यासाठी आपल्या गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात शेअर्स जारी केले आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या शेअर्सच्या संख्येत देखील जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत असला तरी, पुढील काळात तो एका किमतीवर स्थिर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कंपनीला अतिरिक्त शेअर्समुळे अडचणीचां सामना करावा लागू शकतो. या समस्येतून बाहेर येण्यासाठी सुझलॉन एनर्जीला बायबॅक करावे लागेल.

शेअर बायबॅकमध्ये कंपनी आपले स्वतःचे शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी करते, आणि कंपनीच्या शेअरची तरलता निश्चित करते. सध्या जरी सुझलॉन एनर्जी कंपनीची आर्थिक स्थिती शेअर बायबॅक करण्यासाठी चांगली नसली तरी, ज्या दिवशी कंपनी बायबॅक करेल, त्या दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळेल. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 40 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 25 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 23 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x