18 November 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
x

Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुझलॉन शेअरने 3 वर्षात 2000% परतावा दिला, 1.70 रुपयांवरून 31 रुपये झाला, वेळीच एंट्री घ्या

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 32.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43550 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.63 टक्के घसरणीसह 31.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 308 टक्के नफा कमावून दिला आहे.

27 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक आता 2000 टक्क्यांनी वाढला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला प्रत्येकी 3.15 मेगावॅट क्षमतेच्या 16 विंड टर्बाइन जनरेटरचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला मिळालेल्या नवीन ऑर्डर अंतर्गत गुजरात राज्यातील द्वारका जिल्ह्यात सुझलॉन एनर्जी कंपनीला 50 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला 3 मेगावॅट सीरिजच्या पवन टर्बाइनचे ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीला फक्त पवन ऊर्जा टर्बाइनचा पुरवठा करण्याचे नाही तर, प्रकल्पाची पूर्ण अंमलबजावणी, उभारणी आणि कार्यान्वित करण्याचे काम मिळाले आहे.

पवन ऊर्जा प्रकल्प स्थापित व कार्यान्वित झाल्यानंतर सुझलॉन कंपनीला सर्वसमावेशक ऑपरेशन आणि देखभाल सेवा प्रदान करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला मिळालेल्या ऑर्डरुळे 38000 घरांना वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. या पवन ऊर्जा प्रोजेक्टमुळे वार्षिक 1.51 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी जगातील सर्वात मोठी अग्रणी कंपनी मानली जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 31 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x