23 February 2025 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Suzlon Share Price | शेअरची किंमत 48 रुपये! तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 50.72 रुपये किंमत स्पर्श केली होती. मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. काल पहिल्यांदाच या कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर पोहोचले होते. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.45 टक्के वाढीसह 48.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शेवटचे 5 ऑगस्ट 2011 रोजी 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरून 5 रुपये किमतीवर आला होता. नुकताच प्रधानमंत्री मोदींनी देशात “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत देशातील 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहे. याचा फायदा सुझलॉन एनर्जी सारख्या वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना होऊ शकतो.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना मासिक 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे, यासह त्या प्रत्येक कुटुंबाला 15-18 हजार रुपये लाभ होणार आहे. या योजनेचा फायदा अक्षय ऊर्जा आणि सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय कंपन्याना देखील होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकवर देखील पाहायला मिळू शकतो.

डिसेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 160 टक्के अधिक नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 203.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 78.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1,569.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत कंपनीने 1,464.15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, “सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत चार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसत आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक आणखी काही काळ होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 55 ते 60 रुपये किमतीवर जाऊ शकतात. JM Financial फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 54 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 03 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x