18 November 2024 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Suzlon Share Price | सरकारच्या एका निर्णयाने सुझलॉन शेअर्सची घसरगुंडी, पुढे काय होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले पहा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, पवन ऊर्जेच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी भारत सरकार पुन्हा एकदा रिव्हर्स ऑक्शन प्लॅन आणण्याचा विचार करत आहे. त्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अचानक घसरायला सुरुवात झाली. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.21 टक्के घसरणीसह 41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 43.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 41.77 रुपये किमतीवर आला होता. भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ऊर्जा निर्मत्या कंपन्यांसाठी पवन ऊर्जा क्षमतेच्या लिलावासाठी रिव्हर्स ऑक्शन प्लॅन परत आणण्याचा विचार सुरू केला आहे. ऊर्जा मंत्रालयाने NTPC, NHPC, SJVN आणि इतर वीज निर्मात्या PSU सारख्या कंपन्यांना नोटिस देखील पाठवली आहे.

भारत सरकारच्या नविकरणीय ऊर्जा मंत्रालयाने रिव्हर्स ऑक्शनचा पूर्वीचा दृष्टीकोन पुनर्संचयित करून प्लेन व्हॅनिला विंड टेंडरसाठी आकार 600 MW पर्यंत मर्यादित केला आहे. आणि अक्षय ऊर्जा अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींद्वारे संपूर्ण भारतात लिलावाचे आयोजन करणे अनिवार्य केले आहे.

रिव्हर्स ऑक्शन सिस्टम अंतर्गत, होणाऱ्या लिलावात जोपर्यंत कोणत्याही बोलीला आव्हान दिले जात नाही, तोपर्यंत बोलीदार एकमेकांविरुद्ध बोली लावतच राहतात. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाने ही पद्धत रद्द केली होती. जानेवारी 2023 मध्ये केंद्र सरकारने पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत अनेक अमुलाग्र बदल केले होते. ऊर्जा मंत्रालयाने 12 जानेवारी 2024 रोजी माहिती दिली की त्यांनी 2030 पर्यंत वार्षिक 8 गिगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी लिलावाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, भारत सरकारच्या या नियमाचा सुझलॉन एनर्जी कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही. म्हणून जेएम फायनान्शियल फर्मने देखील सुझलॉन स्टॉकवर बाय रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 54 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

कंपनीची ऑर्डर बुक आणि आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे शेअर्स वाढण्याची शक्यता अजून ही कायम आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 390 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 05 March 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x