22 November 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स अजून मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा होणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक दिसत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 10 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 17.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 0.57 टक्के वाढीसह 43.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 331.34 टक्के नफा मिळवून दिला आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच 10 जानेवारी 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 10.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 331.34 टक्के वाढला आहे.

आज या कंपनीचे शेअर्स 43 रुपयेच्या पार गेले आहेत. एकेकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 40 रुपयेच्या पार गेला आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 11 जानेवारी 2019 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमतीवरून सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 782.89 टक्के वाढला आहे.

21 ऑक्टोबर 2005 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 123 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 5 रुपये किमतीवर आला होता. एवढ्या प्रचंड वाढीनंतर देखील या कंपनीचे शेअर्स आपल्या 2005 सालच्या किमतीच्या तुलनेत 64.97 टक्के खाली ट्रेड करत आहेत. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक 43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मात्र तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 50 रुपये आणि त्यानंतर 54 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 10 January 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x