Suzlon Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 100% परतावा, सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, मजबूत कमाई होणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने नुकताच आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 74.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत 100 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.87 टक्के वाढीसह 78.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे अधिग्रहण केले आहे. सुझलॉनने या कंपनीचे 76 टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. ही कंपनी संजय घोडावत ग्रुपचा भाग आहे. हे अधिग्रहण 2 व्यवहारांमध्ये पूर्ण केले जाईल, ज्याचे एकूण मूल्य 660 कोटी रुपये आहे.
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन 73.4 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. शेअर बाजारातील 5 पैकी 3 तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकला BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तर 2 तज्ञांनी या स्टॉकला HOLD रेटिंग दिली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2005 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी शेअरची इश्यू किंमत 500 रुपये होती. मात्र नकारात्मक ट्रिगर्समुळे 2019 पर्यंत हा शेअर 2 रुपये किमतीवर आला होता.
सुझलॉन एनर्जी ही कंपनी भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी अग्रणी कंपनी मानली जाते. ही कंपनी विंड टर्बाइन उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने जागतिक स्तरावर देखील मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे. भारतात ही कंपनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि पर्यावरण अनुकूल ऊर्जा उपाय उपलब्ध करण्यासाठी काम करत आहे. भारताच्या एकूण विंड टर्बाइन मार्केटमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचा वाटा 32 टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price NSE Live 12 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER