22 April 2025 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील वर्षी मे 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 50 रुपयेपर्यंत वाढला होता. मागील काही दिवसापासून शेअर बाजारात मंदी असल्याने शेअर पुन्हा एकदा 40 रुपये किमतीच्या खाली आला आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.01 टक्के घसरणीसह 38.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सुझलॉन एनर्जी ही कंपनी मुख्यतः पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करते. सुझलॉन एनर्जी कंपनीचा इक्विटी बेस 1363 कोटी शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 348.8 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीने भारतातील विंड टर्बाइन मार्केटचा 32 टक्के वाटा काबीज केला आहे. एयूएम कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीची मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत. त्यामुळे हा स्टॉक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीची एकूण स्थापित क्षमता 20 GW आहे.

मागील काही वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनी आपले कर्ज परतफेड करून नफ्यात आली आहे. सध्या मंदीच्या काळात या स्टॉकचे मूल्यांकन खूप महाग दिसत आहे. त्यामुळे हा शेअर 40 रुपये किमतीवर खरेदी करणे योग्य ठरणार नाही. धोरणात्मक पातळीवर जर काही नकारात्मक बातम्या आल्यास सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. मागील वर्षी जून 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यानंतर हा स्टॉक 50 रुपयेपर्यंत पोहचला होता.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये साप्ताहिक चार्टवर हेड अँड शोल्डर पॅटर्न पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत जर काही कारणास्तव हा शेअर 36 रुपये किमतीच्या खाली आला तर शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉकमधे प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 13 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या