14 January 2025 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 294.7 टक्के वाढली आहे. गेल्या 4 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2026 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.41 टक्के वाढीसह 81.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये सध्याच्या पातळीवर किमान 50 टक्के नफा वसुली केली पाहिजे.

तज्ञांच्या मते, या स्टॉकला 100 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळू शकतो. मात्र अल्पावधीत हा स्टॉक 96 रुपयेपर्यंत वाढू शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2005 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी हा स्टॉक 2 रुपये किमतीवर पोहचला होता. 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह 79.93 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.08 लाख कोटी रुपये आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील 5 पैकी 3 तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने या स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘अॅड’ रेटिंग देऊन 70 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ नफा 3 पट वाढून 302 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर एका वर्षभरापूर्वी या कंपनीचा निव्वळ नफा 101 कोटी रुपये नोंदवला गेला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीने जून 2023 तिमाहीत 1,348 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2024 तिमाहीत कंपनीचा महसूल 2,016 कोटी रुपयेवर पोहचला होता.

News Title | Suzlon Share Price NSE Live 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(292)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x