20 April 2025 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत चिंता वाढवणारी अपडेट आली, शेअर्सवर काय परिणाम होणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | अनेक म्युचुअल फंड संस्था भारतीय शेअर बाजारात मजबूत कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये भरघोस गुंतवणूक करत असतात. मागील काही महिन्यापासून तेजीत वाढणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक म्युचुअल फंड संस्थांनी गुंतवणूक केली होती. मात्र आता देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी डिसेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीमधील आपला वाटा 1.33 टक्के पर्यंत खाली आणला आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीपर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीमधील देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा वाटा 4.7 टक्के होता. जून 2023 तिमाहीत या कंपनीत म्युच्युअल फंडाचा वाटा फक्त 0.7 टक्के नोंदवला गेला होता. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.12 टक्के वाढीसह 41.20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

बंधन कोअर इक्विटी म्युचुअल फंडाने सप्टेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये 1.23 टक्के भाग भांडवल धारण केले होते. परंतु, या म्युच्युअल फंडाचे नाव अलीकडील शेअरहोल्डिंग लिस्टमधून वगळण्यात आले आहे. याचा अर्थ त्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीमधील आपली गुंतवणूक 1 टक्के पेक्षा कमी केली आहे.

या म्युचुअल फंडाने सुझलॉन एनर्जी कंपनीतील आपली संपूर्ण गुंतवणूक विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर 2023 तिमाहीत बँक ऑफ बडोदाने सुझलॉन एनर्जी कंपनीचे 1.05 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मात्र या तिमाहीत शेअरहोल्डिंग लिस्टमध्ये या बँकेचे देखील नाव सामील नाही.

ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने विविध म्युचुअल फंडांद्वारे सुझलॉन एनर्जी कंपनीचे 5 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ब्लॅकरॉक ही अमेरिकन कंपनी जागतिक स्तरावर 10 ट्रिलियन डॉलर्स मूल्याची मालमत्ता हाताळते. जणू ही कंपनी पूर्ण जगाची अर्थव्यवस्था हाताळत आहे.

ब्लॅकरॉक कंपनीची युनिट iShares ग्लोबल आणि iShares ग्लोबल क्लीन एनर्जी ETF ने सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. दोन्ही म्युचुअल फंडांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे अनुक्रमे 1.41 टक्के आणि 1.09 टक्के भाग भांडवल धारण केले होते. लंडनस्थित गुंतवणूक व्यवस्थापक बेलग्रेव्ह इन्व्हेस्टमेंट फंडाने देखील डिसेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी या विंड टर्बाइन उत्पादन करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली होती. सप्टेंबर 2023 तिमाहीत त्यांचा वाटा 3.48 टक्के होता, जो आता डिसेंबर तिमाहीत 2.73 टक्केवर आला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला 3 मेगावॅट पवन ऊर्जा टर्बाइनचा पुरवठा करण्याची एक ऑर्डर मिळाली होती. सुझलॉन एनर्जी कंपनी भविष्यात नवीन करारांसाठी 3 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा टर्बाइनवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहे. डिसेंबर 2023 मध्ये कंपनीच्या प्रवर्तकांनी माहिती दिली होती की, कंपनीचे प्रवर्तक कंपनीत आपला वाटा वाढवण्याचा विचार करत नाही.

प्रमोटर्स गटाने सध्या कंपनीचे 13 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकची किंमत 200 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 24 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या