17 November 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Suzlon Share Price | फायद्याची अपडेट! तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक तेजीचे संकेत

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 3 मे 2024 रोजी या कंपनीच्या संचालक मंडळाने (NSE: SUZLON) त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपनी Suzlon Global Services Limited च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या विलीनीकरणासाठी कंपनीच्या शेअरधारक आणि कर्जदारांनीही मान्यता दिली आहे. विलीनीकरणाची अपडेट येताच सुझलॉन एनर्जी स्टॉक दीड टक्क्यांनी वाढून 78.50 रुपये किमतीवर पोहचला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी )

13 ऑगस्ट रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 84.40 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.56 टक्के वाढीसह 78.78 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 260 टक्के वाढली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.07 लाख कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनी विलीनीकरणाबाबत NCLT सोबत सेबीची देखील मंजुरी घेणार आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे अधिग्रहण करून 76 टक्के भागभांडवल खरेदी केले होते. या विलीनीकरणासाठी संजय घोडावत ग्रुपच्या कंपनीसोबत 2 व्यवहारांमध्ये 660 कोटी रुपये किमतीची डील झाली होती. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लेने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

या कंपनीचे शेअर्स 2005 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 500 रुपये होती. त्यानंतर अनेक नकारात्मक ट्रिगर्समुळे हा स्टॉक 2019 मध्ये 2 रुपये किमतीवर आला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीची स्थापना 1995 साली झाली होती. ही कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीचे मुख्यालय पुणे, महाराष्ट्र येथे आहे.

ही कंपनी जगातील आघाडीच्या टर्बाइन उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने जागतिक स्तरावर आपले मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे. भारतात कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि पर्यावरणापूरक अनुकूल ऊर्जा उपायांमध्ये वाढ करण्यासाठी सुझलॉन एनर्जी कंपनी काम करत आहे. भारताच्या टर्बाइन मार्केटमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचा वाटा 32 टक्के आहे.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x