10 January 2025 2:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील ५ ट्रेडिंग सेशन्समध्ये सुझलॉन शेअर 8.18% टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील १ महिन्यात सुझलॉन शेअर 13.98 टक्क्यांनी घसरला आहे.

सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला

बुधवारी सुझलॉन एनर्जी शेअर जवळपास २ टक्क्यांनी घसरून ५९ रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 3.48 टक्क्यांनी घसरून 57.94 रुपयांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी शेअरने २३०० टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत सुझलॉन शेअर 2 रुपयांच्या पातळीवरून 57.94 रुपयांवर पोहोचला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत तपशील काय आहे?

नुकतीच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला प्राप्तिकर अपील लवादाकडून एकूण २६०.३५ कोटी रुपयांच्या दंडावर टॅक्स सवलत मिळाली आहे. याशिवाय क्रिसिल रेटिंग्ज कंपनीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीवरील आपले पतमानांकन ‘क्रिसिल A’ अशी अपग्रेड केली आहे. या रेटिंगवरून सुझलॉन एनर्जी कंपनीची दमदार कामगिरी आणि सुधारित नफा अधोरेखित होतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरबाबत ब्रोकरेजने काय म्हटले

आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल रिसर्च तज्ज्ञ जिगर एस पटेल यांनी सुझलॉन शेअरबाबत म्हटलं आहे की, ‘टेक्निकल सेटअपवर काउंटरवर सुझलॉन शेअरला ५८ ते ५४ रुपयांपर्यंत सपोर्ट आहे. मात्र शेअरने ६५ ते ७० रुपयांची पातळी ओलांडणे आवश्यक आहे. सुझलॉन एनर्जी शेअरची सपोर्ट लेव्हल 58 रुपये आणि रेझिस्टन्स 62 रुपये असेल. सुझलॉन शेअरने ६२ रुपयांची पातळी ओलांडल्यास तो ६५ रुपयांवरून तेजी दाखवू शकतो. तज्ज्ञांच्या मते हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये ५७ ते ६५ रुपयांच्या रेंजमध्ये राहू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Thursday 09 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(290)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x